मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PBKS vs LSG Head To Head: आज पंजाब- लखनौ यांच्यात चुरशीची लढत; पाहा दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड

PBKS vs LSG Head To Head: आज पंजाब- लखनौ यांच्यात चुरशीची लढत; पाहा दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 28, 2023 10:42 AM IST

Punjab Kings vs Lucknow Super Giants Head to Head: पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएल २०२३ मधील ३८वा सामना खेळला जाणार आहे.

PKBS vs LSG
PKBS vs LSG

IPL 2023: आयपीएल २०३३ मध्ये आज (28 एप्रिल) पंजाब किंग्जसमोर लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असेल. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर येतील. याआधीच्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौच्या संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर दोन विकेट्स राखून पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनौचा संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान, पंजाब आणि लखनौ यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलमध्ये आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जचे संघ केवळ दोन वेळा आमनेसामने आले आहेत ज्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक असा विजय मिळवला आहे. आयपीएलमध्‍ये दोघांमध्‍ये पहिला सामना २०२२ च्‍या हंगामामध्ये खेळला गेला होता. हा सामना लखनौ सुपर जायंट्‍सने २० धावांनी जिंकला होता. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला होता.

पंजाबचा संघ:

शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, गुरनूर सिंग, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व टायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, बलतेज सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, सॅम कुरान, सिकंदर रझा , हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग आणि मोहित राठी, शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग.

लखनौचा संघ:

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, मोहसीन खान, मनन वोहरा, मयंक यादव, आवेश खान, यश ठाकूर, मार्कस स्टॉइनिस, डॅनियल सॅम्स, काइल मेयर्स, दीपक हुडा, करण शर्मा, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, के गौतम, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, रोमॅरियो शेफर्ड, अमित मिश्रा, नवीन-उल-हक, युधवीर चरक.

WhatsApp channel

विभाग