मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PBKS vs LSG Live Streaming: पंजाबचे किंग्ज आज लखनौच्या संघाशी भिडणार; कधी, कुठे पाहणार सामना?

PBKS vs LSG Live Streaming: पंजाबचे किंग्ज आज लखनौच्या संघाशी भिडणार; कधी, कुठे पाहणार सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 28, 2023 10:27 AM IST

Punjab Kings vs Lucknow Super Giants Live Streaming: पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएल २०२३ मधील ३८वा सामना खेळला जाणार आहे.

Shikhar Dhawan KL Rahul
Shikhar Dhawan KL Rahul

IPL 2023: पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज आयपीएल २०२३ मधील ३८वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पंजाब आणि लखनौच्या संघाने प्रत्येक सात-सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन्ही संघाने चार-चार सामने जिंकले आहेत. परंतु, रनरेट चांगला असल्यामुळे लखनौच्या संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तर, पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना आज (२८ एप्रिल २०२३) संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रवाह 'जिओ सिनेमा' अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. येथे वेगवेगळ्या भाषांमध्ये सामना पाहता येणार आहे.

पंजाबचा संघ:

शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, गुरनूर सिंग, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व टायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, बलतेज सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, सॅम कुरान, सिकंदर रझा , हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग आणि मोहित राठी, शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग.

लखनौचा संघ:

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, मोहसीन खान, मनन वोहरा, मयंक यादव, आवेश खान, यश ठाकूर, मार्कस स्टॉइनिस, डॅनियल सॅम्स, काइल मेयर्स, दीपक हुडा, करण शर्मा, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, के गौतम, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, रोमॅरियो शेफर्ड, अमित मिश्रा, नवीन-उल-हक, युधवीर चरक.

WhatsApp channel

विभाग