मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PBKS Vs KKR IPL Highlights : पंजाब किंग्जची विजयी सुरुवात, केकेआरचा सात धावांनी पराभव

PBKS Vs KKR IPL Highlights : पंजाब किंग्जची विजयी सुरुवात, केकेआरचा सात धावांनी पराभव

Apr 01, 2023 03:07 PM IST

PBKS Vs KKR IPL Score : आयपीएल 2023 च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. पंजाबने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना ७ धावांनी जिंकला.

PBKS Vs KKR IPL Live Score
PBKS Vs KKR IPL Live Score

IPL Cricket Score, PBKS vs KKR Indian Premier League 2023 : आयपीएल 2023 च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. पंजाबने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना ७ धावांनी जिंकला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १६ षटकांत १४६ धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना थांबला. पंजाबकडून धवनने ४० आणि राजपक्षेने ५० धावा केल्या. अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत ३ बळी घेतले.

ट्रेंडिंग न्यूज

PBKS Vs KKR IPL Score updates

केकेआरचा पराभव

आयपीएल 2023 च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. पंजाबने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना ७ धावांनी जिंकला.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १६ षटकांत १४६ धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना थांबला. त्यावेळी शार्दुल ठाकूर ३ चेंडूत ८ आणि सुनील नरेन दोन चेंडूत ७ धावा करून खेळत होते.

कोलकाताला विजयासाठी २४ चेंडूत ४६ धावांची गरज होती. या जोडीला लक्ष्य गाठता आले असते, पण पाऊस सुरू झाल्याने सामना पुढे खेळवता आला नाही. त्यादरम्यान कोलकाता संघ डकवर्थ लुईस पद्धतीनुसार सात धावांनी मागे होता. याच कारणामुळे कोलकाताला त्याच फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

PBKS Vs KKR IPL Live Score : कोलकात्याची सातवी विकेट पडली

१३८ धावांच्या स्कोअरवर कोलकात्याची सातवी विकेट पडली. व्यंकटेश अय्यर २८ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

त्याच्याआधी आंद्रे रसेल १९ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. सॅम करनने त्याला सिकंदर रझाकरवी झेलबाद केले. रसेलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

PBKS Vs KKR IPL Live Score : केकेआरच्या ९ षटकांत ७५ धावा

केकेआरच्या ९ षटकांत ७५ धावा झाल्या आहेत. त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले आहेत. सध्या सध्या व्यंकटेश अय्यर १४ चेंडूत २० आणि नितीश राणा १५ चेंडूत २४ धावांवर खेळत आहेत. केकेआरला विजयासाठी ६६ चेंडूत ११७ धावांची आवश्यकता आहे.

PBKS Vs KKR IPL Live Score : व्यंकटेश अय्यर कोलकाताचा इम्पॅक्ट प्लेयर

कोलकाता संघाने वेंकटेश अय्यरचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात समावेश केला आहे. त्याने वरुण चक्रवर्तीची जागा घेतली आहे. याआधी पंजाब संघाने भानुका राजपक्षेच्या जागी ऋषी धवनचा संघात समावेश केला होता.

PBKS Vs KKR IPL Live Score : कोलकात्याची दुसरी विकेट पडली

१७ धावांवर कोलकात्याची दुसरी विकेट पडली. अर्शदीप सिंगने अनुकुल रॉयला सिकंदर रझाकरवी झेलबाद केले. त्याने एकाच षटकात दोन विकेट घेत कोलकाता संघाला बॅकफूटवर आणले आहे. अनुकुल रॉयने पाच चेंडूत चार धावा केल्या.

PBKS Vs KKR IPL Live Score : केकेआरला पहिला धक्का 

१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची फलंदाजी सुरू झाली आहे. रहमानउल्ला गुरबाज आणि मनदीप सिंग यांनी डावाची सुरुवात केली आहे. पहिले षटक संपल्यानंतर कोलकाताची धावसंख्या एका बाद १३ धावा आहे. दुसऱ्या षटकात मनदीप सिंग झेलबाद झाला.

PBKS Vs KKR IPL Live Score : खराब प्रकाशामुळे सामना थांबला

कोलकाताचे फलंदाज क्रीझवर येऊन फलंदाजीसाठी सज्ज झाले होते. पंजाबचा संपूर्ण संघही गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता. मात्र, खराब प्रकाशामुळे दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. लवकरच सामना सुरू होण्याची शक्यता आहे.

PBKS Vs KKR IPL Live Score : पंजाबच्या १९१ धावा 

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून १९१ धावा केल्या. पंजाबकडून भानुका राजपक्षेने सर्वाधिक ५० धावा केल्या. कर्णधार शिखर धवन ४०, सॅम करण २६, प्रभसिमरन सिंग २३ आणि जितेश शर्मा २१ धावा करून बाद झाले. कोलकाताकडून टीम साऊदीने दोन बळी घेतले. उमेश यादव, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

डावाची सुरुवात करणाऱ्या कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन कौर यांना पहिल्या विकेटसाठी केवळ २३ धावा करता आल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या भानुका राजपक्षेने पहिल्या ६ षटकांत १ गडी गमावून संघाची धावसंख्या ५६ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

धवन-राजपाक्षे यांच्यात महत्वाची भागीदारी

यानंतर भानुका राजपक्षे एका बाजूने गतीने धावा करत राहिला, तर दुसऱ्या बाजूने कर्णधार धवन जबाबदारीने खेळताना दिसला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत ८६ धावांची शानदार भागीदारी झाली. भानुका ३२ चेंडूत ५० धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाब किंग्ज संघाला तिसरा धक्का जितेश शर्माच्या रूपाने बसला, जो ११ चेंडूत २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी कर्णधार धवनही २९ चेंडूत ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

सॅम करन शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी

 पंजाबने १४३ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर सॅम करन आणि सिकंदर रझा या जोडीने पंजाब किंग्जचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ५व्या विकेटसाठी २० चेंडूत २५ धावांची भागीदारी केली. रझा १३ चेंडूत १६ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 

यानंतर सॅम करन आणि शाहरुख खान यांनी २० षटकांत संघाची धावसंख्या १९० पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सॅम करनने २६ तर शाहरुख खानने ११ धावांची नाबाद खेळी केली.

PBKS Vs KKR IPL Live Score : पंजाबची धावसंख्या दीडशेच्या पुढे 

पंजाब किंग्जच्या धावसंख्येने चार विकेट गमावून १५० धावा केल्या आहेत. सिकंदर रझा आणि सॅम करण क्रीजवर आहेत. पंजाबची धावसंख्या १६ षटकांत ४ बाद १५३ अशी आहे.

PBKS Vs KKR IPL Live Score : पंजाबच्या पॉवरप्लेमध्ये ५६ धावा

पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या ६ षटकात पंजाबने १ बाद ५६ धावा केल्या आहेत. शिखर धवन १२ चेंडूत १५ तर भानुका राजपाक्षे १२ चेंडूत १८ धावांवर खेळत आहेत.

PBKS Vs KKR IPL Live Score : पंजाबची पहिली विकेट पडली

पंजाब किंग्जची पहिली विकेट २३ धावांवर पडली. प्रभसिमरन सिंग १२ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. टीम साऊदीने त्याला यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाजच्या हाती झेलबाद केले.

PBKS Vs KKR IPL Live Score : दोन्ही संघ

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन) : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टिम साऊदी, अनुकुल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

PBKS Vs KKR IPL Live Score : कोलकाताने नाणेफेक जिंकली

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघ प्रथमच चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत आहे. गेल्या मोसमानंतर ब्रेंडन मॅक्क्युलमने कोलकाता प्रशिक्षकपद सोडले. कोलकाताचे चार परदेशी खेळाडू आंद्रे रसेल, रहमानउल्ला गुरबाज, टीम साऊथी आणि सुनील नरेन आहेत. त्याचवेळी पंजाबचे चार परदेशी खेळाडू भानुका राजपक्षे, सिकंदर रझा, सॅम करन, नॅथन एलिस आहेत.

नितीश राणावर मोठी जबाबदारी

 केकेआरसाठी प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. श्रेयस अय्यरची कमी संघाला जाणवणार आहे. नवा कर्णधार नितीश यांच्यासमोर दुहेरी जबाबदारी पार पाडण्याचे मोठे आव्हान आहे.

तर धवनला यापूर्वी हैदराबादचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे, पण त्याच्या फलंदाजीशिवाय त्याच्या कर्णधार कौशल्याचीही कसोटी लागणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या शाकिब अल हसन आणि लिटन दास यांच्याशिवाय केकेआर खेळणार आहे. अष्टपैलू आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड वेस, व्यंकटेश अय्यर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. 

WhatsApp channel