मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs SL Final: पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य, श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेची झंझावाती खेळी

PAK vs SL Final: पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य, श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेची झंझावाती खेळी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 11, 2022 09:35 PM IST

Pakistan Vs Sri Lanka Asia Cup 2022 Final: श्रीलंकेने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावा केल्या. भानुका राजपक्षेने तुफानी खेळी खेळली. ४५ चेंडूत राजपक्षेने ७१ धावा चोपल्या.

PAK vs SL Final
PAK vs SL Final

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आज आशिया कप T20 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. पाच वेळचा चॅम्पियन श्रीलंका आणि दोन वेळचा चॅम्पियन पाकिस्तान हे जेतेपदाच्या लढतीत आमनेसामने आहेत. 

फायनलमध्ये नाणेफेक हारल्यानंतर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करावी लागली. श्रीलंकेने २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावा केल्या आहेत. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेने तुफानी खेळी खेळली. त्याने ४५ चेंडूत ७१ धावा केल्या. एका क्षणी श्रीलंकेने ५८ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. पथुम निसांका (८), कुसल मेंडिस (०), धनंजय डी सिल्वा (२८), दानुष्का गुनाथिलका (१), दासून शनाका (२) लवकर बाद झाले.

त्यानंतर राजपक्षेने हसरंगासोबत सहाव्या विकेटसाठी ३६ चेंडूत ५८ धावांची भागीदारी रचली. हसरंगाने २१ चेंडूत ३६ धावांच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याला हरिस रौफने झेलबाद केले.

राजपक्षेने ३५ चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक ठोकले. त्याने चमिका करुणारत्नेसोबत सातव्या विकेटसाठी ३१ चेंडूत ५४ धावांची नाबाद भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये प्रथमच एका संघाने ६ व्या आणि ७ व्या विकेटसाठी ५०+ धावांची भागीदारी केली आहे.

राजपक्षेने ७१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट १५७.७८ होता. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याचवेळी नसीम शाह, शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोन्ही संघ

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (सी), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश टेकशाना, प्रमोद मदुशन, दिलशान मदुशंका.

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (क), फखर जमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन.

WhatsApp channel

संबंधित बातम्या