मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB VS GT : रोहित शर्माची मुंबई इंडियन्स मागच्या दारानं प्लेऑफमध्ये, विराटच्या आरसीबीला शुभमननं पाजलं पाणी

RCB VS GT : रोहित शर्माची मुंबई इंडियन्स मागच्या दारानं प्लेऑफमध्ये, विराटच्या आरसीबीला शुभमननं पाजलं पाणी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 22, 2023 12:40 AM IST

mumbai indians qualified for ipl 2023 playoffs : मुंबई इंडियन्स हा IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. गुजरातकडून आरसीबीचा पराभव झाल्याने रोहितच्या पलटणने अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

mumbai indians in playoffs ipl 2023
mumbai indians in playoffs ipl 2023

mumbai indians in playoffs ipl 2023 : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 चे प्लेऑफ तिकीट बुक केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुजरात टायटन्सविरुद्ध करा किंवा मरोच्या सामन्यात विजय नोंदवू शकला नाही. या पराभवासह आरसीबीचा आयपीएल २०२३ मधील प्रवासही संपुष्टात आला आहे. बंगळुरूच्या पराभवासह रोहितच्या पलटणने (Mumbai Indians qualified for IPL 2023 Playoffs) अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

आरसीबीला विजय मिळवता आला नाही

गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात आरसीबी संघाला विजयाची नोंद करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने स्कोअर बोर्डवर ५ गडी गमावून १९७ धावा केल्या होत्या. संघाच्या वतीने विराट कोहलीने चांगली फलंदाजी करताना IPL 2023 मध्ये सलग दुसरे शतक झळकावले. मात्र, शुभमन गिलच्या नाबाद शतकामुळे कोहलीच्या शतकाची मेहनत वाया गेली. गुजरातने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर १९८ धावांचे लक्ष्य गाठले.

मुंबई प्लेऑफमध्ये

आरसीबीच्या पराभवासह मुंबई इंडियन्सला प्लेऑफचे तिकीटही मिळाले आहे. आज (२१ मे) झालेल्या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय नोंदवला. मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरूला गुजरातविरुद्ध हरणे आवश्यक होते. यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ १६ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा मुंबईचा संघ चौथा संघ ठरला आहे. २४ मे रोजी एलिमिनेटर सामन्यात मुंबईची लखनौ सुपरजायंट्सशी लढत होईल.

विराटवर शुभमनचं शतक भारी

IPL 2023 मध्ये विराट कोहलीने सलग दुसरे ठोकले. पण विराटचे आजचे शतक व्यर्थ गेले. महत्वाच्या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज फ्लॉप ठरले आणि १९८ धावांचे लक्ष्य त्यांना राखता आले नाही. कोहलीने शानदार फलंदाजी करताना ६१ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी शुभमन गिलने ५२ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या. त्याने षटकार ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला.

WhatsApp channel