मराठी बातम्या  /  क्रीडा  /  World Cup 2023 : मिचेल मार्शचं डोकं ठिकाणावर आहे का? टीम इंडियाबाबत विचित्र भाकीत, म्हणाला...

World Cup 2023 : मिचेल मार्शचं डोकं ठिकाणावर आहे का? टीम इंडियाबाबत विचित्र भाकीत, म्हणाला...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 04, 2023 06:53 PM IST

World Cup 2023 Mitchell Marsh : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने एकदिवसीय विश्वचषकाबाबत एक अंदाज वर्तवला आहे. मार्श म्हणाला की, ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा ३८५ धावांनी पराभव करेल.

Mitchell Marsh prediction for World Cup 2023 final
Mitchell Marsh prediction for World Cup 2023 final

Mitchell Marsh prediction for World Cup 2023 final : भारतात यावर्षी क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ होणार आहे. वनडे विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. १२ वर्षांनंतर भारतात पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. टीम इंडियाने शेवटच्या वेळी २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

यावर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया भारतीय भूमीवर विश्वविजेते बनण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श याने या स्पर्धेबाबत एक विचित्र भाकीत केले आहे.

मिचेल मार्शची अजब भविष्यवाणी

आगामी विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार असल्याचे मिचेल मार्शने सांगितले आहे. अंतिम सामन्यात कांगारू संघ भारताचा ३८५ धावांनी पराभव करेल,असेही मार्शने सांगितले. ३१ वर्षीय मार्श म्हणाला की ऑसीज त्यांच्या डावात ४५० धावा करण्याचा प्रयत्न करेल, त्यानंतर ते भारताला ६५ धावांवर ऑलऊट करतील.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना मार्श म्हणाला, "फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया २ गडी गमावून ४५० धावा करेल. त्याचवेळी, भारतीय संघ ६५ धावांवर ऑलआऊट होईल. आयपीएल 2023 मध्ये मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळत आहे.

२००३ मध्ये काय घडले ते जाणून घ्या

२००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २ गडी गमावून ३५९ धावा केल्या होत्या. पाँटिंगने १२१ चेंडूत चार चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव ३९.२ षटकांत २३४ धावांवर संपुष्टात आला होता.

WhatsApp channel