मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA WC: मेक्सिकन बॉक्सरची मेस्सीला धमकी; म्हणाला, चुकूनही माझ्यासमोर येऊ नको!

FIFA WC: मेक्सिकन बॉक्सरची मेस्सीला धमकी; म्हणाला, चुकूनही माझ्यासमोर येऊ नको!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 29, 2022 11:48 AM IST

Mexican Boxer Canelo Alvarez vs Lionel Messi: मेक्सिकन संघाची जर्सी मेस्सीच्या पायाजवळ पडलेली दिसली, अशा स्वरूपाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यानंतर मेक्सिकन बॉक्सर कॅनेलो अल्वारेझने मेस्सीला धमकी दिली आहे. यापुढे मेस्सी माझ्या समोर येऊ नये अशी प्रार्थना करावी, असे ट्विट त्याने केले आहे.

Canelo Alvarez vs Lionel Messi
Canelo Alvarez vs Lionel Messi

फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाने मेक्सिकोचा पराभव केला. या सामन्यात अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीने निर्णायक गोल केला. या विजयानंतर मेस्सी एका नव्या वादात सापडला आहे. मेक्सिकोवरील विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी प्रचंड जल्लोष केला. या जल्लोषादरम्यान मेक्सिको संघाची जर्सी मेस्सीच्या पायाजवळ पडलेली दिसली. यादरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे.

कॅनेलो अल्वारेझनं दिली मेस्सीला धमकी

यानंतर मेक्सिकोच्या समर्थकांनी मेस्सीवर निशाणा साधला आहे. तसेच, मेक्सिकन बॉक्सर कॅनेलो अल्वारेझने मेस्सीला धमकी दिली आहे. अल्वारेझने ट्विटरवर लिहिले की, मेस्सी मेक्सिकन जर्सीच्या साह्याने फरशी साफ करत आहे. हे मेक्सिकन लोकांचा अनादर करणारे आहे. यापुढे मेस्सी माझ्यासमोर दिसू नये, यासाठी देवाकडे प्रार्थना करा. मी अर्जेंटिनाचा जसा आदर करतो तसाच मेस्सीने मेक्सिकोचा आदर केला पाहिजे".

खरं तर, सामन्यानंतर मेस्सीने मेक्सिकन खेळाडूसोबत आपली जर्सी एक्सेंज केली होती. त्यानंतर लॉकर रूममध्ये जाताना शूज काढतेवेळी जर्सी खाली पडली आणि त्यावर अनवधानाने त्याचा पाय जर्सीवर पडला. अर्जेंटिनाचा माजी फॉरवर्ड सर्जियो अग्युरो मेस्सीच्या समर्थनार्थ पुढे आला आहे

दोन खेळाडू मेस्सीच्या बचावासाठी

कॅनेलोच्या ट्विटला उत्तर देताना तो म्हणाला की, "मिस्टर कॅनेलो, लढण्यासाठी प्रकरण शोधू नका." तुम्हाला सॉकरबद्दल काहीच माहिती नाही. लॉकर रूममध्ये, शर्ट घामाने भिजल्यामुळे बहुतेक तो काढला जातो आणि जमिनीवर ठेवला जातो. सोबतच स्पेनचा माजी खेळाडू फॅबर्जेस म्हणाला की, 'ड्रेसिंग रूममध्ये टी-शर्ट जमिनीवर असणे सामान्य आहे. बहुतेक खेळाडू असेच करतात, कारण त्यानंतर ती लाँड्रीमध्ये जाते".

दोन वेळच्या विश्वविजेत्या अर्जेंटिनाने शनिवारी मेक्सिकोचा २-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिना संघाच्या फिफा विश्वचषकाच्या राउंड ऑफ १६ मध्ये पोहोचण्याच्या आशा अबाधित आहेत. आता अर्जेंटिनाचा सामना पोलंडशी ३० नोव्हेंबरला होणार आहे. जर संघाने तो सामना जिंकला तर तो गटात अव्वल स्थानी राहून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचवेळी, सामना अनिर्णित राहिल्यास, संघाला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून रहावे लागेल. पोलंडविरुद्धचा पराभव अर्जेंटिनासाठी कठीण होऊ शकतो.

WhatsApp channel