मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kohli Naveen Fight : कोहलीची माफी मागण्यास नवीन उल-हकचा नकार, कर्णधाराला झिडकारत गेला मैदानाबाहेर

Kohli Naveen Fight : कोहलीची माफी मागण्यास नवीन उल-हकचा नकार, कर्णधाराला झिडकारत गेला मैदानाबाहेर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 02, 2023 04:20 PM IST

Kohli vs Naveen Ul Haq : आरसीबीचा सलामीवीर विराट कोहली आणि लखनौचा गोलंदाज नवीन उल-हक यांच्यात सामना संपल्यानंतर चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

Kohli Naveen Ul Haq Fight In IPL 2023
Kohli Naveen Ul Haq Fight In IPL 2023 (HT)

Kohli Naveen Ul Haq Fight In IPL 2023 : लखनौ आणि आरसीबीत झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळाला. अमित मिश्रा, नवीन उल-हक आणि गौतम गंभीर एका बाजूला तर विराट कोहली एका बाजूला अशा पद्धतीच्या भांडणामुळं क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. परंतु कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातील भांडणात नेमकी चूक कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामन्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुलने नवीनला विराट कोहलीची माफी मागण्यास सांगितलं. परंतु नवीनने त्यासाठी नकार देत मैदानाबाहेर निघून जाणं पसंत केलं. त्यामुळं आता अनेकांनी नवीन उल-हकला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

विराटची माफी मागण्यास नवीनचा नकार...

सामना सुरू असताना आणि सामना संपल्यानंतर देखील विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात वाद होत असल्यामुळं या प्रकरणात लखनौचा कर्णधार केएल राहुलने मध्यस्थी केली. विराट कोहलीने सर्व प्रकरण केएल राहुलला समजावून सांगितलं. त्यानंतर राहुलने नवीन उल-हकला विराटची माफी मागण्यास सांगितलं. परंतु कर्णधाराच्या मागणीला झिडकारून लावत नवीन उल-हकने मैदान सोडणं पसंत केलं. त्यामुळं नवीनचं अशा उद्धट वर्तनावर अनेकांनी तोंडसुख घेतलं आहे. याशिवाय अनेकांनी कोहलीची पाठराखण करत त्यांचं वर्तन योग्यच होतं, असं म्हटलं आहे.

Kohli vs Naveen Ul Haq : कांगारुंना घाम फोडणाऱ्या विराटला अफगाणी गोलंदाज नडला, कोण आहे नवीन उल-हक?

विराट कोहलीशी झालेल्या वादानंतर आयपीएलच्या प्रशासकीय समितीनं कोहली आणि नवीन उल-हक यांना लेव्हल एक नुसार दोषी ठरवलं आहे. त्यामुळं विराटची संपूर्ण मॅच फीस तर नवीनची ५० टक्के मॅच फीस कपात करण्यात आली आहे. त्यामुळं आता अफगाणिस्तानच्या निवेदित खेळाडूने विराटशी पंगा घेतल्यानंतर अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. तर काहींनी नवीनला विराटने उगाचंच डिवचलं होतं, असं म्हणत कोहलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरसीबी आणि लखनौत झालेल्या सामन्यात कोच असलेल्या गौतम गंभीर याच्यावरही आयपीएलने कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे.

WhatsApp channel