मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार कसा झाला? अनिल कुंबळेने सांगितला किस्सा
how rohit sharma become mumbai indians captain
how rohit sharma become mumbai indians captain

IPL 2023 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार कसा झाला? अनिल कुंबळेने सांगितला किस्सा

18 March 2023, 16:43 ISTRohit Bibhishan Jetnavare

how rohit sharma become mumbai indians captain : रोहित शर्मा २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार का आणि कसा झाला याबद्दल अनिल कुंबळेने खुलासा केला आहे.

Anil Kumble On Rohit Sharma IPL 2023: रोहित शर्मा आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने एकूण ५ आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. रोहित शर्मा २०१३ पासून मुंबईची धुरा सांभाळत आहेत. पण रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार का आणि कसे करण्यात आले हे तुम्हाला माहिती आहे का?

ट्रेंडिंग न्यूज

भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळेने याबाबत एक मजेशीर खुलासा केला आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा कर्णधार कसा झाला हे त्याने सांगितले आहे.

अनिल कुंबळे हा २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचा मेंटॉर होता. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ३ वर्षे खेळला होता. त्यावेळी जॉन राइट हे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. अनिल कुंबळेने जिओ सिनेमावर ही रंजक गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला की, “आम्ही आयपीएल २०१३ मध्ये ४-५ सामने गमावले होते. मी आणि जॉन राईटने रोहित शर्माला विचारले होते की तुला मुंबई इंडियन्सचे कर्णधार बनायचे आहे का? यावर उत्तर देताना रोहित म्हणाला की, तो संघाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे.

“यानंतर आम्ही मागे वळून पाहिले नाही. कर्णधार म्हणून तो शानदार आहे आणि त्याने आतापर्यंत सर्वाधिक आयपीएल जिंकले आहेत."

रोहित शर्मापूर्वी रिकी पाँटिंग संघाचे नेतृत्व करत होता. पण त्याच्या कर्णधारपदाखाली टीम चांगली कामगिरी करत नव्हती. त्यामुळे संघाचा कर्णधार बदलण्यात आला.

रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्सचा भाग

विशेष म्हणजे, त्याच्या कर्णधारपदाच्या २ वर्षांपूर्वी म्हणजे २०११ पासून रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. रोहित शर्माने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २२७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५८७९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १ शतक आणि ४० अर्धशतके केली आहेत.