मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs GT : धोनी है तो मुमकिन है… चेन्नई सुपर किंग्ज १०व्यांदा IPL फायनलमध्ये, पाचव्या जेतेपदापासून एक पाऊल दूर

CSK vs GT : धोनी है तो मुमकिन है… चेन्नई सुपर किंग्ज १०व्यांदा IPL फायनलमध्ये, पाचव्या जेतेपदापासून एक पाऊल दूर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 23, 2023 11:56 PM IST

Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujrat Titans : चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून विक्रमी १०व्यांदा इंडियन प्रीमियर लीगची अंतिम फेरी गाठली आहे. २८ मेला अहमदाबादेत अंतिम सामना रंगणार आहे.

Qualifier 1 GT vs CSK
Qualifier 1 GT vs CSK

GT vs CSK Qualifier 1 HIGHLIGHTS : महेंद्रसिंग धोनीने आपल्या करिष्माई कर्णधारपदाखाली चेन्नई सुपर किंग्जला विक्रमी १०व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत नेले आहे. आयपीएलच्या १६व्या मोसमात मंगळवारी रात्री (२३ मे) गुजरात टायटन्सला सीएसकेविरुद्ध क्वालिफायर-1 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७३ धावांच्या प्रत्युत्तरात गतविजेता गुजरातचा संघ १५७ धावांवर आटोपला. 

गुजराकडून राशिद खान (१६ चेंडूत ३० धावा) पुन्हा एकदा एकटाच लढताना दिसला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तसे पाहता गुजरातला आयपीएल फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

गुजरातचा संघ आता क्वालिफायर २ मध्ये लखनौ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याला भिडणार आहे. हा सामना २६ मे रोजी होईल. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत सीएसकेला भिडेल.

तत्पूर्वी, २० व्या षटकात गुजरातला विजयासाठी २७ धावांची गरज होती. धोकादायक दिसणारा राशिद खान १९व्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने चेन्नईचा विजय निश्चित झाला. गुजरातकडून फॉर्मात असलेल्या शुभमन गिलने ३८ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहर, महिष थीक्षाना आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले. 

१४व्या षटकात दीपक चहरने स्लो कटरमध्ये शुभमन गिलची शिकार केली, हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तोपर्यंत सामना गुजरातच्या बाजूने होता. त्यावेळी गुजरात टायटन्सने १३ षटकात ८८ धावा केल्या होत्या. त्यांना ४२ चेंडूत ८५ धावा हव्या होत्या.

सीएसकेचा डाव

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (४४ चेंडूत ६० धावा, चार चौकार, एक षटकार) याच्या जोरावर सात गडी बाद १७२ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे (३४ चेंडूत ४० धावा) सोबत पहिल्या विकेटसाठी दोघांनी ६४ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणे (१० चेंडूत १७), अंबाती रायडू (नऊ चेंडूत १७ ) यांनी मधल्या षटकांमध्ये निराशा केली. शेवटी, रवींद्र जडेजाने १६ चेंडूत २२ धावा करून संघाला १७० धावांचा टप्पा गाठून दिला. महेंद्रसिंग धोनीकडून षटकारांची अपेक्षा करणाऱ्या चाहत्यांची निराशा झाली. एक धाव काढून तो मोहितचा दुसरा बळी ठरला. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर दर्शन नळकांडे, रशीद खान आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

WhatsApp channel