मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का; तडाखेबाज फलंदाज मालिकेतून बाहेर

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का; तडाखेबाज फलंदाज मालिकेतून बाहेर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 21, 2023 04:44 PM IST

Border- Gavaskar Trophy 2023: दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध मालिकेतून बाहेर पडला आहे.

IND vs AUS
IND vs AUS

David Warner Ruled Out: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धुळ चारत २-० ने आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा सामना ०१-०५ मार्च दरम्यान खेळला जाणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का लागला आहे. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर मालिकेतून बाहेर पडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून याबाबत माहिती देण्यात आली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप डेव्हिड वॉर्नरच्या बदलीची घोषणा केली नाही. डेव्हिड वॉर्नरचे मालिकेतून बाहेर पडणे ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठा धक्का मानला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली होती. या सामन्याच्या दुसऱ्या डावातही तो फलंदाजी करण्यासाठी आला नव्हता. यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून आज जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात डेव्हिड वॉर्नर मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती दिली.

या मालिकेत २-० ने पिछाडीवर गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. पहिल्या दोन कसोटीत संघाबाहेर असलेला कॅमेरून ग्रीन आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ग्रीनचे तिसऱ्या कसोटी सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमधील स्थान जवळपास निश्चित मानली जाते. ग्रीनचा संघात समावेश केल्याने ऑस्ट्रेलियाला गोलंदाजीतही अतिरिक्त पर्याय मिळू शकतो.

भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाला एका डावाने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाच्या पदरात निराशा पडली.

WhatsApp channel

विभाग