मराठी बातम्या  /  क्रीडा  /  आतापर्यंत ११ जणांच्या नेतृत्वात खेळलाय कार्तिक, 'हा' कर्णधार पाकिस्तानी होता

आतापर्यंत ११ जणांच्या नेतृत्वात खेळलाय कार्तिक, 'हा' कर्णधार पाकिस्तानी होता

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 19, 2022 09:22 PM IST

दिनेश कार्तिकने २००४ साली सौरव गांगुली टीम इंडियाचा कर्णधार असताना वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले, तेव्हा संघाचा कर्णधार राहुल द्रविड होता.

DK
DK

दिनेश कार्तिक (Dinesh karthik) हा सध्याच्या घडीला टीम इंडियातील (team india) सर्वात अनुभवी खेळाडू आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर दिनेश कार्तिक टीम इंडियाचा भाग नव्हता. तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळत होता, पण तिथे त्याला फारसे यश मिळाले नाही. मात्र, २०२२ च्या आयपीएलने कार्तिकचे नशीबच पालटले. आयपीएल २०२२ पूर्वी त्याला पूर्णवेळ समालोचक आणि अर्धवेळ क्रिकेटर म्हटले जात होते, परंतु आता तो पुन्हा भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसत आहे.

याच महिन्यात ३७ वर्षांचा झालेल्या दिनेश कार्तिकच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत, जे क्वचितच इतर खेळाडूंच्या नावावर असतील.

असाच एक विक्रम म्हणजे, दिनेश कार्तिक हा आत्तापर्यंत ९ खेळाडूंच्या नेतृत्वाखाली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे, या सोबतच, आयसीसीच्या संघाचाही सामना पकडला तर तो ११ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. यात एका पाकिस्तानी कर्णधाराचा देखील समावेश आहे, कारण तो आयसीसीकडून खेळला होता. त्या सामन्यात शाहिद आफ्रिदी कर्णधार होता.

दिनेश कार्तिकने २००४ साली सौरव गांगुली टीम इंडियाचा कर्णधार असताना वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले, तेव्हा संघाचा कर्णधार राहुल द्रविड होता. त्यानंतर दिनेश कार्तिकने २००६ मध्ये झालेला भारताचा पहिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही खेळला होता, त्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेला होता.

गांगुली, द्रविड आणि सेहवाग व्यतिरिक्त, दिनेश कार्तिकने अनिल कुंबळे, एम एस धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि रिषभ पंत यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. या महिन्यात तो हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. तसेच, कार्तिकने पाकिस्तानी दिग्गज शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालीही ICC XI संघाकडून सामना खेळला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या