मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Haris Rauf wife: बायकोच्या सौंदर्यामुळं हारिस रौफ हैराण, जाहीर स्पष्टीकरण द्यावं लागलं

Haris Rauf wife: बायकोच्या सौंदर्यामुळं हारिस रौफ हैराण, जाहीर स्पष्टीकरण द्यावं लागलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 26, 2022 05:32 PM IST

Haris Rauf wife Instagram: पाकिस्तानी क्रिकेटर हारिस रौफ आपल्या पत्नीच्या सौंदर्यामुळे हैराण झाला आहे. त्याची पत्नी मुजना मलिकच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंट्स तयार केले जात आहेत. यानंतर आपली पत्नी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसल्याचे हारिस रौफने जाहीर केले आहे.

Haris Rauf wife
Haris Rauf wife

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने शनिवारी (२४ डिसेंबर) मॉडेल मुजना मसूद मलिकशी लग्न केले. या विवाहसोहळ्याला अनेक बडे लोक उपस्थित होते. या क्षणाचे काही अप्रतिम फोटो त्याने सोशल मीडियावरदेखील शेअर केले आहेत. लग्नाच्या एका दिवसानंतरच हारिस रौफसोबत विचित्र घटना घडली आहे. यामुळे त्याला पुढे येऊन जाहीर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुजना व्यवसायाने एक मॉडेल आहे आणि खूप सुंदर आहे. अशा परिस्थितीत हरिस रौफचे चाहते त्याच्या बायकोचे फोटो इंटरनेटवर सर्च करत आहेत. यानंतर सोशल मीडियावर मुजना मसूद मलिकच्या नावाने अनेक फेक अकाऊंट्स तयार करण्यात आली आहेत आणि त्याद्वारे तिचे फोटो शेअर केले जात आहेत. या अकाऊंट्सबाबत हारिसने स्पष्टीकरण दिले आहे. आपली पत्नी सोशल मीडियावर सक्रिय नसल्याचा खुलासा रौफने ट्विट करून केला आहे. तिच्या नावाने शेअर करण्यात आलेले सर्व फोटो फेक असल्याचे त्याने सांगितले आहे.

हारिस रौफचं ट्वीट

हारिसने ट्विटमध्ये लिहिले की, "सर्वांना नमस्कार. मला एवढेच सांगायचे आहे की माझी पत्नी मुजना मसूद मलिक कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही. तिचे कोणतेही अधिकृत अकाऊंट नाही. व्हायरल होणाऱ्या पोस्ट्सपासून सावध रहा. तुमच्या सर्व प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद".

दरम्यान, यापूर्वी काही अशाही बातम्या आल्या होत्या की मुजना हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटची प्रायव्हसी सेटिंग चेंज केली आहे. हरीस आणि मुजना हे क्लासमेट्स होते. त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी आता लग्न केले आहे.

हारिस रौफची पत्नी मुजना मलिक एक फॅशन मॉडेल, टिकटॉक स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. इंस्टाग्रामवर ५२ हजारांहून अधिक लोक मुजनाला फॉलो करतात. तसेच मुजना इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी इस्लामाबाद (IIUI) मध्ये BS मीडिया आणि कम्युनिकेशनची विद्यार्थिनी आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग