मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GT vs MI: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज चुरशीची लढत, कधी, कुठे पाहणार सामना?

GT vs MI: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज चुरशीची लढत, कधी, कुठे पाहणार सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 25, 2023 09:17 AM IST

Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२३ मधील ३५वा सामना खेळला जाणार आहे.

GT vs MI
GT vs MI

Gujarat Titans vs Mumbai Indians Live Streaming: अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२३ मधील ३५वा सामना खेळला जाणार आहे. या हंगामातील पहिल्या टप्प्यातील हा शेवटचा सामना असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला पंजाब किंग्जविरुद्ध १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर, गुजरात टायटन्सने शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर ७ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहायचे? जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ संघर्ष करताना दिसला आहे. या हंगामातील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात मुंबईच्या संघाला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मुंबईच्या संघाने पुढील तीन सामने जिंकून जोरदार पुनरागमन केले. परंतु, २२ एप्रिलला पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे गुजरात टायटन्सचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघाने सहापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, दोन सामने गमावले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ चौथ्या क्रमांकावर आणि मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना आज (२५ एप्रिल २०२३) संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रवाह 'जिओ सिनेमा' अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. येथे वेगवेगळ्या भाषांमध्ये सामना पाहता येणार आहे.

गुजरात टायटन्स संघ:

ऋद्धिमान साहा (विकेटकिपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल, यश दयाल.

मुंबई इंडियन्स संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, तिलक वर्मा, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी, विष्णू विनोद, रिले मेरेडिथ, संदीप वॉरियर, डुआन जॅन्सन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल.

WhatsApp channel

विभाग