मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wrestling Protest: बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Wrestling Protest: बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 29, 2023 07:07 AM IST

Wrestling Protest: दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया तसेच निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wrestling Protest
Wrestling Protest

Delhi Police files FIR against protesting wrestlers: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या नामवंत कुस्तीपटूंचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी (२८ मे २०२३) संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी ही कारवाई केली. या सर्वांविरुद्ध १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३, पीडीपीपी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

"आमचा लैंगिक शोषण करणाऱ्या ब्रिजभूषण विरोधात एफआयआर नोंदवायला दिल्ली पोलिसांना सात दिवस लागले आणि शांततेने आंदोलन करणाऱ्या आमच्याविरोधात एफआयआर नोंदवायला सात तासही लागले नाहीत. या देशात हुकूमशाही सुरू झाली आहे का? सरकार आपल्या खेळाडूंशी कसे वागते हे सारे जग पाहत आहे. नवा इतिहास लिहिला जात आहे, अशा आशायचे ट्विट विनेश फोगाटने केले आहे.

बजरंग पुनिया म्हणाला की, "मी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस काहीच बोलत नाहीत. मी काही गुन्हा केला आहे का? ब्रिजभूषण तुरुंगात असायला हवे होते. आम्हाला तुरुंगात का ठेवले आहे?"

रविवारी ‘महिला महापंचायत’ दरम्यान, नवीन संसद भवनाकडे जात असताना दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पैलवानांमध्ये विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि इतर विरोधक कुस्तीपटूंचाही यामध्ये समावेश असल्याचे दिसून येत आहे.

WhatsApp channel

विभाग