मराठी बातम्या  /  Sports  /  David Compeleted 16 Thousnad Runs In Internationl Cricket, Also David Warner Become Second Batsman To Out On 99 Runs Due To Stupming, Vvs Laxman Was First

९९ धावांवर यष्टीचीत होणारा वॉर्नर दुसरा फलंदाज, नंबर एकवर 'हा' स्टाईलीश भारतीय

david warner
david warner (hindustan times)
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Jun 22, 2022 03:40 PM IST

डेव्हिड वॉर्नरने (davdi warner) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा वॉर्नर हा सहावा ऑस्ट्रेलियन (austrelia) फलंदाज ठरला आहे.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (austrelia vs srilanka) यांच्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. श्रीलंकेने चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी पराभव करत मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर (premdasa stedium) मंगळवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९ षटकांत २५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ ५० षटकांत २५४ धावांवर गारद झाला. श्रीलंकेकडून चरिथ अस्लंकाने (charith aslanka) शानदार शतकी खेळी केली, त्याने ११० धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही (david warner) शानदार खेळी केली. पण ती व्यर्थ ठरली. वॉर्नर ११२ चेंडूत ९९ धावा काढून बाद झाला. त्याचे त्याचे १९ वे वनडे शतक अवघ्या एका धावेने हुकले. वॉर्नरने आपल्या खेळीत १२ चौकार मारले. ऑस्ट्रेलियन डावाच्या ३८ व्या षटकात धनंजय डी सिल्वाच्या गोलंदाजीवर त्याला यष्टिरक्षक डिकवेलाने यष्टीचीत केले. एकदिवसीय सामन्यात ९९ धावांवर यष्टीचीत होणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे.

त्याच्या आधी भारताचा व्हीव्हीएस लक्ष्मण २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ९९ धावांवर स्टंम्पिंग होऊन बाद झाला होता.

सोबतच वन-डेत ९९ धावांवर बाद होणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी, मॅथ्यू हेडन २००१ मध्ये भारताविरुद्ध ९९ धावांवर आणि अॅडम गिलख्रिस्ट २००३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९९ बाद झाला होता. वनडेमध्ये एका धावेने शतक हुकण्याचा विक्रम भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन ९९ धावांवर तीन वेळा बाद झाला आहे.

श्रीलंकेविरुद्घच्या या ९९ धावांच्या खेळीनंतर वॉर्नरने एक विशेष कामगिरीही केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा वॉर्नर हा सहावा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, अॅलन बॉर्डर, मायकेल क्लार्क, मार्क वॉ हे त्याच्या पुढे आहेत. पाँटिंगच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार ३६८ धावा आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा:

रिकी पाँटिंग : २७ हजार ३६८

स्टीन वॉ: १८ हजार ४९६

अॅलन बॉर्डर: १७ हजार ६९८

मायकेल क्लार्क: १७ हजार ११२

मार्क वॉ: १६ हजार ५२९

डेव्हिड वॉर्नर: १६ हजार ३७

संबंधित बातम्या