मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022 : हॉकीत भारतीय महिलांना एकदाच सुवर्ण, यंदा तशाच पराक्रमाची अपेक्षा

CWG 2022 : हॉकीत भारतीय महिलांना एकदाच सुवर्ण, यंदा तशाच पराक्रमाची अपेक्षा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 21, 2022 08:02 PM IST

स्पेन आणि नेदरलँड्सने संयुक्तपणे आयोजित केलेल्या हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघ ९ व्या स्थानावर राहिला. मात्र, बर्मिंगहॅम (Commonwealth Games 2022) येथे भारतीय महिला संघ पदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.

CWG 2022
CWG 2022

Commonwealth Games 2022: भारतीय महिला हॉकी संघाने एकदाच सुवर्णपदक पटकावले आहे. २००२ मध्ये मँचेस्टरमध्ये भारताने इंग्लंडचा ३-२ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. र २००६ मेलबर्नमध्ये भारताने रौप्यपदक जिंकले होते. महिला संघ १९९८ आणि २०१८ मध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता. महिला हॉकीमध्येही ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने हॉकीत ४ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकले आहे. त्याच वेळी, न्यूझीलंड संघाने २०१८ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

अलीकडेच, स्पेन आणि नेदरलँड्सने संयुक्तपणे आयोजित केलेल्या हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघ ९ व्या स्थानावर राहिला. मात्र, बर्मिंगहॅम येथे भारतीय महिला संघ पदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.  

दरम्यान, भारताला इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घानासह पूल अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. पूल बीममध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि केनिया यांचा समावेश आहे.

कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला हॉकी संघ:

गोलरक्षक : सविता पुनिया (कर्णधार), रजनी एतिमार्पू.

बचावपटू: दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता.

मिडफिल्डर: निशा, सुशीला चानू, पुक्रंबम, मोनिका, नेहा, ज्योती, नवज्योत कौर, सलीमा टेटे.

फॉरवर्डः वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी, संगीता कुमारी.

महिला हॉकीमधील भारताचे सामने- 

29 जुलै : भारत विरुद्ध घाना

३० जुलै: भारत विरुद्ध वेल्स

2 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड

३ ऑगस्ट : भारत वि. कॅनडा

 

WhatsApp channel

विभाग