मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Womens Cricket : विश्वचषक जिंकला अन् खेळाडूंची चांदी; ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सचा पगार वाढला

Womens Cricket : विश्वचषक जिंकला अन् खेळाडूंची चांदी; ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सचा पगार वाढला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 03, 2023 05:47 PM IST

Womens Cricket Match Fees : महिला क्रिकेटर्सच्या वार्षिक पगारात तब्बल ६६ टक्क्यांची घसघशीत वाढ करण्याचा निर्णय बोर्डानं घेतला आहे. याशिवाय करारबद्ध क्रिकेटर्सची संख्याही वाढवण्यात आली आहे.

Australian Female Cricketer Salary
Australian Female Cricketer Salary (HT)

Australian Female Cricketer Salary : बीसीसीआय आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं महिला क्रिकेटर्सचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानंही महिला खेळाडूंची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या नव्या नियमांनुसार महिला ऑसी संघातील खेळाडूंच्या वार्षिक पगारात तब्बल ६६ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून करारबद्ध खेळाडूंची संख्याही वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर आता खुश झालेल्या ऑस्ट्रेलियन बोर्डानं महिला खेळाडूंना भलंमोठं गिफ्ट दिलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्यानुसार महिला खेळाडूंचे पगार वाढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं महिला खेळाडूंचा पगार ६६ टक्क्यांनी तर पुरुष संघाच्या खेळाडूंचा पगार ९.५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या करारबद्ध खेळाडूंची संख्या २० वरून २४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. बिग बॅश लीगमध्ये सर्वात जास्त पगार देण्यात आलेल्या महिला खेळाडू एक दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच ५.५ कोटी रुपये कमावू शकतात. यात कॅटेगरीत ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिचा समावेश आहे. त्यामुळं आता मेग लॅगिंग आणि एलिस पेरी यांच्यासह अन्य महिला खेळाडूंच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं टीम इंडियाच्या महिला खेळाडूंची नवीन करार यादी घोषित केली होती. त्यात ए श्रेणीत येणाऱ्या महिलांना खेळाडूंना ५ कोटी रुपयांचा पगार देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डानंही महिला खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं आता भारत आणि न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खेळाडूंच्या मानधनात जबरदस्त वाढ करण्यात आली आहे.

WhatsApp channel