मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : आयपीएल सामने पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना कडक इशारा, ‘या’ पोस्टर्सवर बंदी

IPL 2023 : आयपीएल सामने पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना कडक इशारा, ‘या’ पोस्टर्सवर बंदी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 03, 2023 05:16 PM IST

No CAA NRC Protest IPL 2023 : आयपीएल सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) यांना विरोध करणारे पोस्टर झळकवण्याची (No CAA NRC Protest during ipl) परवानगी दिली जाणार नाही.

NO CAA NRC Protest IPL 2023
NO CAA NRC Protest IPL 2023

Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या फॉर्मेटमध्ये खेळवली जात आहे. ज्यामध्ये संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर ७ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या दरम्यान दिल्ली, मोहाली, हैदराबाद आणि अहमदाबाद येथे खेळल्या जाणार्‍या सामन्यांबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या शहरांतील स्टेडियममध्ये सामना पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक इशारा देण्यात आला आहे.

मैदानात जावून CAA , NRC ला विरोध करता येणार नाही

या ४ शहरांमधील सामन्यांदरम्यान, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) यांना विरोध करणारे पोस्टर झळकवण्याची परवानगी दिली जाणार नाही. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघाच्या घरच्या सामन्यांसाठी पेटीएम इनसाइडरला तिकिटे विकण्याचा अधिकार आहे.

पेटीएम इनसाइडरने स्टेडियममध्ये नेता येणार नाही, अशा वस्तूंची यादी जारी केली आहे. यामध्ये CAA आणि NRC निषेधाशी संबंधित पोस्टर्सचाही समावेश आहे.

फिफा वर्ल्डकपमध्ये असेच घडले होते

बीसीसीआयशी सल्लामसलत केल्यानंतरच असा नियम बनवल्याचे सांगितले जात आहे. सोबतच बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने २०२२ च्या फिफा वर्ल्डकपची आठवण करून दिली आहे. कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकादरम्यान अनेक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली होती.

WhatsApp channel