मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat kohli IPL century : कोहलीच्या शतकी खेळीवर अनुष्का खूश, मैदानातूनच केला व्हिडिओ कॉल

Virat kohli IPL century : कोहलीच्या शतकी खेळीवर अनुष्का खूश, मैदानातूनच केला व्हिडिओ कॉल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 19, 2023 03:28 PM IST

Virat kohli 6th IPL century : आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी कोहलीने हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकावून सर्वांना आपला चाहता बनवले. दरम्यान, कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma instagram post on Virat kohli) पतीच्या या खेळीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

virat-anuskha
virat-anuskha

Anushka Sharma on Virat kohli 6th IPL century : आयपीएल 2023 च्या ६५व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबादचा (srh) ८ गडी राखून पराभव केला. १८ मे (गुरुवार) रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात पूर्ण केले. आरसीबीच्या विजयाचे हिरो विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस ठरले.

विराट कोहलीने ६३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. तर डु प्लेसिसने ४७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. डु प्लेसिसने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. डू प्लेसिस आणि कोहली यांनी मिळून १७.५ षटकांत १७२ धावांची तुफानी भागीदारी केली.

अनुष्काची इन्स्टाग्राम स्टोरी

कोहलीच्या या धमाकेदार खेळीने त्याची पत्नी अनुष्काही खूपच प्रभावित झाली होती. सामन्यानंतर लगेच तिने विराटला (virat anuskha video call) व्हिडीओ कॉल केला. सोबतच तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कोहलीच्या खेळीचा एक फोटो शेअर केला आणि त्यात लिहिले आहे की "तो फटाका आहे. काय इनिंग होती!"

IPL मध्ये कोहलीच्या नावावर सर्वाधिक शतके

विराट कोहलीने ६३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

कोहलीने २३७ आयपीएल सामन्यांमध्ये सहा तर गेलने १४२ सामन्यात ६ शतके झळकावली आहेत.

आयपीएल २०१६ हा कोहलीसाठी खूप यशस्वी हंगाम होता, ज्यामध्ये त्याने ४ शतके आणि ७ अर्धशतकांसह एकूण ९७३ धावा केल्या होत्या. तो ऑरेंज कॅपचा विजेता होता. कोहलीने २०१६ पासून त्याच्या आयपीएल कारकिर्दीत बरेच चढ-उतार पाहिले आहेत, त्याच्यासाठी २०१८ ते २०२० पर्यंतचे हंगाम खूपच निराशाजनक होते.

WhatsApp channel