SL vs AFG 1st ODI : धोनीचं मुख्य अस्त्र वनडेत फ्लॉप, बेबी मलिंगानं ८ षटकांत दिल्या ‘इतक्या’ धावा
sl vs afg highlights odi series: अफगाणिस्तानचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला.
sri lanka vs afghanistan highlights : जवळपास दोन महिने चाललेला इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) १६ वा मोसम मोठ्या दिमाखात संपला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आयपीएलनंतर सर्व खेळाडू आता आपापल्या मायदेशी परतले आहेत आणि देशासाठी खेळत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
अशातच, अफगाणिस्तानचा संघ सध्या (sl vs afg 1st odi highlights ) श्रीलंका दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला. या मालिकेतील सर्व सामने हंबनटोटा येथे खेळवले जाणार आहेत.
पहिल्या वनडेत पाथिराना फ्लॉप
या सामन्यात सलामीवीर इब्राहिम झद्रानने अफगाणिस्तानसाठी ९८ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. झादरानचे शतक २ धावांनी हुकले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण इथे पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे आयपीएलमध्ये धोनीच्या सीएसके संघाचा मुख्य खेळाडू असलेला वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना या पहिल्या वनडेत फ्लॉप ठरला आहे.
बेबी मलिंगा म्हणून ओळखल्या जाणार्या पाथीरानाची अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. या सामन्यात पाथीरानाने ८.५ षटके टाकली आणि ६६ धावा दिल्या. यादरम्यान त्याला एकच विकेट घेता आली. पाथीरानाचा इकॉनॉमी रेट ७.४७ होता.
सामन्यात काय घडलं?
या सामन्यातील विजयासह अफगाणिस्तानने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ २६८ धावांवर गारद झाला. चारिथ अस्लंकाने संघाकडून सर्वाधिक ९१ धावा केल्या. तर धनंजय डी सिल्वाने ५१ धावांची खेळी केली.
यानंतर अफगाणिस्तान संघाने २६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४६.५ षटकांत ४ गडी गमावून सामना जिंकला. इब्राहिम झादरानने संघाकडून सर्वाधिक ९८ धावांची खेळी खेळली. रहमत शाहने ५५ धावा केल्या. अशा प्रकारे अफगाणिस्तानने हा सामना आपल्या नावावर केला. आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शनिवारी (४ जून) होणार आहे.