मराठी बातम्या  /  धर्म  /  Vijayadashami 2022 : दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी का केलं जातं रावणाचं पूजन, काय आहे त्यामागची कथा

Vijayadashami 2022 : दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी का केलं जातं रावणाचं पूजन, काय आहे त्यामागची कथा

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Oct 05, 2022 09:25 AM IST

Why Ravan Is Being Worshipped In Some Parts Of India : यंदा दसरा ५ ऑक्टोबरला साजरा होत आहे. या दिवशी ठिकठिकाणी रावणाचे दहन केले जाते. पण देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथे दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जात नाही तर त्याची पूजा केली जाते.

रावण
रावण (हिंदुस्तान टाइम्स)

दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून लोक विजयादशमीचा सण साजरा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथे दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जात नाही, तर त्याची पूजा केली जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते.

१. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे रावणाचे दहन केले जात नाही. बैजनाथ कांगडा येथेच रावणाने भगवान शंकराला त्याच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न केले होते, असे तेथील लोक मानतात आणि तेव्हापासून आजतागायत तेथील लोक रावणाला शिवाचा परम भक्त मानून त्याची पूजा करतात.

२. जोधपूरच्या मौदगिलमध्ये रावण हा ब्राह्मण समाजाचा वंशज मानला जातो. या कारणास्तव, लोक रावण दहन करण्याऐवजी त्याची पूजा करतात आणि त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान देखील करतात.

३. उत्तर प्रदेशातील बिसराखमध्ये रावणाचे दहन केले जात नाही, परंतु तेथे रावण आणि रावणाचे वडील ऋषी विश्व यांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार रावणाचा जन्म उत्तर प्रदेशातील बिसरख येथे झाला. विश्व ऋषींच्या नावावरून त्या ठिकाणाचे नाव पडले.

४. महाराष्ट्रातील गडचिरोली या गावातही लोक रावणाचे दहन करण्याऐवजी त्याची पूजा करतात. असे म्हटले जाते की रावण हा देवांचा पुत्र होता आणि त्याने आपल्या आयुष्यात कोणतीही चूक केली नाही.

५. उज्जैनच्या चिकली गावातही रावणाच्या पुळया जाळण्याऐवजी तिची पूजा केली जाते. रावणाची पूजा केली नाही तर संपूर्ण गाव उद्ध्वस्त होईल, अशी लोकांची श्रद्धा असल्याने दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी या गावात रावणाची मोठी मूर्ती बसवून त्याची पूजा केली जाते.

WhatsApp channel

विभाग