बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वक्तव्यामुळे तर, कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आयरा प्रसिद्धी झोतात असते. आयरा खान पुन्हा एकदा तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे, ज्यामध्ये तिने एकाकीपणाची भीती व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये आयरा खानने लिहिले आहे की, तिच्या आजूबाजूचे लोक तिच्यावर खूप प्रेम करतात, पण तरीही एकटे राहण्याची भीती तिला सतावत आहे. आयरा खानने यात लिहिले की, 'मला भीती वाटते, मला एकटेपणाची भीती वाटते. मला असहाय्य होण्याची भीती वाटते, मला जगातील प्रत्येक वाईट गोष्टीची (हिंसा, रोग, क्रूरता) भीती वाटते. मला माझी आई गमावण्याची भीती वाटते, मला वेदना होण्याची भीती वाटते. मला गप्प राहण्याची भीती वाटते.’
आयरा खानने पुढे लिहिले की, तिच्या या भीतीवर कोणताही उपाय नाही. तिला एखादे गाणे किंवा चित्रपट पाहून बरे वाटते. जेव्हा कोणी तिला सुरक्षित वाटेल किंवा सर्व काही ठीक आहे, असे सांगते तेव्हा तिला चांगले वाटते.’ लग्नाच्या ४ महिन्यांनंतर आयराने अशी पोस्ट शेअर करून चाहत्यांची चिंता वाढवली आहे. नेटिझन्स एकच प्रश्न विचारताना दिसत आहेत की, जर ती विवाहित आहे तर तिला एकटं का वाटते आहे? सध्या आयराची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
३ जानेवारीला नुपूर शिखरेसोबत रजिस्टर लग्न केल्यानंतर आयरा खानने १० जानेवारी २०२४ रोजी उदयपूरच्या अरवली हिल हॉटेलमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फंक्शन बरेच दिवस चालले होते, ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरलही झाले. यावेळी संपूर्ण कुटुंब खूप मस्ती करताना दिसले. दोघांच्या ग्रॅण्ड लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून होती. नुपूर शिखरे हा आमिर खानचा ट्रेनर होता. त्याने आमिर खानच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये खूप मदत केली.
आयरा खान आणि नुपूर शिखरे हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात नुपूर आणि आयरा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. यामधून त्यांनी आपले प्रेम जगजाहीर केले होते. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि यावर्षी त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचा जोडीदार म्हणून स्वीकार केला.