ज्योतिषशास्त्र सांगते की, नवग्रहांच्या हालचालींचा परिणाम माणसाच्या दैनंदिन जीवनावर देखील होतो. आता शुक्राच्या गोचरामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. काहींच्या जीवनात आनंद वाढणार आहे. नऊ ग्रहांपैकी शुक्र हा सर्वात विलासी मानला जातो. भगवान शुक्र हे सुख, विलास, सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक आहे. भगवान शुक्र महिन्यातून एकदा आपली स्थिती बदलतो. भगवान शुक्राच्या संक्रमणाचा सर्व राशींवर चांगला प्रभाव पडेल.
२४ एप्रिल रोजी शुक्राने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. त्याच राशीत तो १९ मे पर्यंत भ्रमण करणार आहे. नंतर शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या संक्रमणाचा सर्व राशींवर चांगला परिणाम होत असला, तरी काही राशींना मोठे फायदे होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या आहेत 'या' राशी…
मीन: मीन राशीच्या दुसऱ्या घरामध्ये शुक्राचा प्रवेश झाला आहे. यामुळे मीन राशीसाठी धन योग वाढला आहे. व्यवसायात तुमच्या ग्राहकांची संख्या वाढली की, मिळकत देखील वाढणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन घर आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील सर्व समस्या दूर होतील.
कुंभ : कुंभ राशीच्या तिसऱ्या घरात शुक्राचे भ्रमण आहे. कुंभ राशीच्या लोकांची इच्छाशक्ती वाढेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. इतरांना मदत करण्यात तुम्हाला रस असेल. अध्यात्मात रुची वाढेल. धार्मिक कार्य कराल. शनीच्या प्रभावामुळे आलेले संकट दूर होऊन प्रतिष्ठा निर्माण होईल.
मकर: शुक्र या राशीच्या चौथ्या भावात भ्रमण करतो. परिणामी, या राशींचे लोक आनंदी जीवन जगतील. मित्रांकडून मदत आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. नवीन घर आणि जमीन खरेदीचे योग येतील. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. ज्यांना या वेळेचा उपयोग नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी तो सुरू करा.
धनु: भगवान शुक्र धनु राशीच्या पाचव्या घरात प्रवेश करत आहे. या राशीने धनप्राप्तीचा योग मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले गुण मिळतील. प्रेमात तुमचा विजय होईल. प्रेमविवाह होईल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ मिळेल. वरिष्ठांची साथ मिळेल. जर उद्योजकाला पूर्वी कोणताही नफा मिळविण्यात काही अडचण आली असेल तर ती या कालावधीत दूर केली जाईल.