Prajakta Mali photos: ‘मराठी राजभाषा दिना’च्या निमित्ताने प्राजक्ता माळीने हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
(1 / 5)
‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…’ असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 5)
‘मराठी राजभाषा दिना’च्या निमित्ताने प्राजक्ता माळीने हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. नऊवारी साडी, मराठमोळा साज, नाकात नथ या पारंपारिक लूकमध्ये प्राजक्ता अतिशय सुंदर दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 5)
आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते. नुकतेच तिने सुंदर नऊवारी साडीमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 5)
‘कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी लिहीलेल्या या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या मराठीवर.. जे आहे आज, राहील उद्या, परवा.. मरणोत्तरही….’ असं म्हणत प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 5)
मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सगळ्याच क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचे नाव अग्रक्रमी आहे. (Photo: @prajakta_official/IG)