मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Manish Pandey: पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं, मी लग्न करतोय; मनीष पांडेच्या लग्नाआधी काय घडलं?

Manish Pandey: पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं, मी लग्न करतोय; मनीष पांडेच्या लग्नाआधी काय घडलं?

Dec 29, 2022 11:42 AM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Manish Pandey & Ashrita Shetty love story: IPL २००८ मध्ये शतक झळकावल्यानंतर मनीष पांडे पहिल्यांदा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरेत आला. इथून तो सुपर हिट झाला. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. यानंतर आता रणजी ट्रॉफी २०२२-२३ च्या मोसमात द्विशतक झळकावल्यानंतर मनीष पांडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनीषने गोव्याविरुद्ध १८६ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी केली आहे.

मनीषला अवघ्या ५ दिवसांपूर्वीच आयपीएल मिनी लिलावात मनीष पांडेला दिल्ली कॅपिटल्सने २.४० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मनीषने पहिल्यांदाच अशी खेळी केलेली नाही. संघाप्रती त्याचे समर्पण खूप जुने आहे. मनीषने कर्नाटकाला सय्यद मुश्ताक ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यानंतर त्याने सात फेरे घेतले होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

 मनीषने २०१९ मध्ये लग्न केले, तेही एका अभिनेत्रीसोबत. त्याच्या पत्नीचे नाव अश्रिता शेट्टी आहे. दोघांच्या लग्नाची कहाणी खूपच रंजक आहे. मनीषचे लग्न झाले तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होता. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

२०१९ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो कर्नाटकाचा कर्णधार होता. त्यावर्षी कर्नाटकाने ही ट्रॉफी जिंकली होती. ही ट्रॉफी जिंकून दिल्यानंत मनीष पांडे थेट लग्नाच्या मंडपात पोहोचला होता. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

१ डिसेंबर २०१९ रोजी सय्यद मुश्ताक ट्रॉफीची फायनल होती. हा सामना सुरत मध्ये होणार होता. तर २ डिसेंबर २०१९ रोजी मनीष पांडेचे लग्न होते. त्यानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघासोबतही सामील व्हायचे होते. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

१ डिसेंबर रोजी मनीषने सय्यद मुश्ताक ट्रॉफीची फायनल खेळली आणि कर्नाटकाला विजेतेपद पटकावून दिले. त्यानंतर त्याने थेट मुंबई गाठली. जिथे त्याचे लग्न होणार होते. मनीषने तामिळनाडूविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये ६० धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. त्याने ४५ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकार मारले होते. आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर काही तासांनी मनीष पांडेने अश्रिता शेट्टीसोबत सात फेरे घेतले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

फायनल सामना संपल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये त्याने पहिल्यांदा आपल्या लग्नाचा खुलासा केला होता. त्याने सामना जिंकल्यानंतर सांगितले की, "भारताच्या मालिकेची प्रतीक्षा आहे, पण त्याआधी माझ्यासाठी आणखी एक महत्त्वाची मालिका आहे, मी उद्या लग्न करतोय." यापूर्वी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही बोलले नव्हते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

मनीष पांडे आणि अश्रिता शेट्टी यांचा विवाह दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय रितीरिवाजांनी झाला होता. लग्नात हे जोडपे एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत होते. अश्रिताने लाल आणि सोनेरी रंगाची सिल्क साडी घातली होती, तर मनीष पांडे क्रीम शेरवानी आणि मॅचिंग सेहरामध्ये स्टायलिश दिसत होता.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

(8 / 10)

मनीष पांडे आणि अश्रिता शेट्टी अनेकदा त्यांचे रोमँटिक आणि प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, मनीष पांडेने अद्याप त्याच्या लव्हस्टोरीबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, मनीष जेव्हा आयपीएलमध्ये सनरायझर्सकडून खेळत होता, तेव्हा तो आणि अश्रिता जवळ आले असावेत, असा अंदाज आहे. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

Manish Pandey & Ashrita Shetty love story
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

Manish Pandey & Ashrita Shetty love story(all photos, Manish Pandey & Ashrita Shetty instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज