Homemade Ginger Candy: कोरडा खोकला झाला आहे? गूळ-आल्याची कँडी ठरेल गुणकारी!
ताप-सर्दी कमी झाली तरी खोकला कमी होत नाहीये? अशावेळी गूळ आणि आल्यापासून कँडी बनवा जी नक्कीच मदत करेल.
(1 / 5)
जसजसे हवामान बदलते तसतसे सर्दी, ताप आणि खोकला अशा समस्या जाणवतात. अनेकदा सर्दी आणि ताप कमी झाला तरी खोकला येतोच. खोकल्यामुळे छाती आणि घशात वेदना होतात. कोरडा खोकला तर जास्त त्रास देतो.
(2 / 5)
तुमच्या घरातील लहान मुले आणि वृद्धांना खोकल्याचा त्रास होत असेल तर त्यांना ही गूळ आणि आल्याची कँडी बनवून खायला द्या. यामुळे खोकल्यापासून त्वरित आराम मिळेल. कशी बनवायची ही कँडी जाणून घेऊयात.
(3 / 5)
ही कँडी तयार करण्यासाठी आले १५० ग्रॅम, गूळ ३०० ग्रॅम, काळे मीठ एक टीस्पून, हळद पावडर १ टीस्पून, देशी तूप १ टीस्पून, तुळशीची पाने मूठभर, पिठीसाखर लागेल.
(4 / 5)
कँडी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये १५० ग्रॅम आले मीठ घालून चांगले परतून घ्या. नंतर मीठातून आले काढून टाका. आले सोलून त्याचे तुकडे करा. आल्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि तुळशीची पाने घालून एकत्र बारीक करा. आता ही पेस्ट एका प्लेटमध्ये घ्या आणि त्यात ३०० ग्रॅम गूळ मिसळा. गॅसवर पॅन गरम करा आणि ही पेस्ट घाला. गूळ वितळल्यावर त्यात एक चमचा काळे मीठ, एक चमचा हळद घालून नीट ढवळून घ्यावे. सर्व काही एकजीव झालं की गॅसवरून उतरवा.
(5 / 5)
आता या मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यावर पिठीसाखर भुरभुरा. ही कँडी चघळल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. तुमचा घसा दुखत असला तरीही तुम्ही ही कँडी चोखू शकता. झटपट आराम मिळेल.
इतर गॅलरीज