मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Akash Thosar Birthday: ‘सैराट’मुळे रातोरात झाला स्टार; अभिनेता आकाश ठोसर बद्दल ‘हे’ ऐकलंय का?

Akash Thosar Birthday: ‘सैराट’मुळे रातोरात झाला स्टार; अभिनेता आकाश ठोसर बद्दल ‘हे’ ऐकलंय का?

Feb 24, 2023 08:54 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Happy Birthday Akash Thosar: नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आकाश ठोसरला यानंतर अनेक चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली.

‘सैराट’ या चित्रपटाने मनोरंजन विश्वात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात ‘परशा’ची भूमिका साकारून अभिनेता आकाश ठोसर रातोरात सुपरस्टार झाला. आज (२४ फेब्रुवारी) आकाश ठोसर याचा वाढदिवस आहे. (Photo: @akashthosar/IG) 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आकाश ठोसरला यानंतर अनेक चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. (Photo: @akashthosar/IG)   
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

महाराष्ट्रातील सोलापूर येथे जन्मलेल्या आकाशने पुण्यातून शिक्षण घेतले आहे. आकाश त्याच्या कुटुंबासह पुण्यात राहतो. अभिनय विश्वात पदार्पण करण्यापूर्वी आकाश ठोसर कुस्ती खेळायचा. कुस्तीसाठी तो सोलापूरच्या जेऊर गावात एका आखाड्यात सराव करायचा. (Photo: @akashthosar/IG) 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सराव संपल्यानंतर तो काही वेळ रोज गावापासून दूर फिरायला जायचा. एके दिवशी आकाश रेल्वे स्टेशनवर बसला होता, त्यादरम्यान नागराजच्या भावाने गुपचूप त्याचे काही फोटो काढले. त्याने हे फोटो नागराजला पाठवले, काही दिवसांनी आकाशला चित्रपटात काम करण्याबाबत विचारण्यात आले. (Photo: @akashthosar/IG) 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

आकाशनेही कुस्ती सोडून चित्रपटात काम करण्यास लगेच होकार दिला. ‘सैराट’ या चित्रपटासाठी त्याने नागराजच्या सल्ल्याने तब्बल १३ किलो वजन कमी केले होते. (Photo: @akashthosar/IG) 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

आकाशनेही कुस्ती सोडून चित्रपटात काम करण्यास लगेच होकार दिला. ‘सैराट’ या चित्रपटासाठी त्याने नागराजच्या सल्ल्याने तब्बल १३ किलो वजन कमी केले होते. (Photo: @akashthosar/IG) 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज