(4 / 4)नागपूर शहराला लागूनसलेल्या रामटेक मतदारसंघात कॉंग्रेसमधून शिवसेना (शिंदे गटात) गेलेले आमदार राजू पारवे यांची शाम बर्वे (कॉंग्रेस) यांच्याशी थेट लढत आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचे जातप्रमाणपत्र अमान्य झाल्याने त्यांचे पती शाम बर्वे रिंगणात आहेत. रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा याने पारवे यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. दरम्यान, कॉंग्रेसकडून विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार, 'आप'चे खासदार संजय सिंह, कॉंग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बर्वे यांच्यासाठी प्रचार केला.