मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला; जिवाच्या आकांताने नागरिक पळत सुटले रस्त्यावर, पाहा फोटो

Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला; जिवाच्या आकांताने नागरिक पळत सुटले रस्त्यावर, पाहा फोटो

Mar 22, 2023 06:55 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

Earthquake: दिल्ली-NCR सह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केल वर याची तीव्रता ६.६ होती. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्तानमधील फैजाबाद येथे होता. अहवालानुसार, तुर्कमेनिस्तान, भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानसह अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपास १० सेकंद जमीन थरथरत होती. दिल्लीत लोक भीतीने घराबाहेर पडले. हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्तानमध्ये होता.

People outside their homes after feeling tremors. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

People outside their homes after feeling tremors. (Sameer Sehgal/ Hindustan Times)

भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील कलाफगानपासून ९०  किमी अंतरावर असल्याचे मानले जाते आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील कलाफगानपासून ९०  किमी अंतरावर असल्याचे मानले जाते आहे. (Sameer Sehgal/ Hindustan Times)

सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये घाबरलेले लोक घरे आणि इमारतींमधून बाहेर पळत असतांनाचे चित्र आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये घाबरलेले लोक घरे आणि इमारतींमधून बाहेर पळत असतांनाचे चित्र आहेत. (Sameer Sehgal/ Hindustan Times)

जेवण झाल्यानंतर नागरिक झोपेच्या तयारीत असतांना अचानक जमीन हादरू लागली. यामुळे अनेक नागरिक जिवाच्या भीतीने कुटूंबासह बाहेर पडले व रस्त्यावर आले.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

जेवण झाल्यानंतर नागरिक झोपेच्या तयारीत असतांना अचानक जमीन हादरू लागली. यामुळे अनेक नागरिक जिवाच्या भीतीने कुटूंबासह बाहेर पडले व रस्त्यावर आले.  (Ravi Kumar/ Hindustan Times)

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबसह उत्तर भारतीय राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काही सेकंदांपर्यंत जमीन दादरत असल्याचे  जाणवल्याने लोक घराबाहेर पडले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबसह उत्तर भारतीय राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काही सेकंदांपर्यंत जमीन दादरत असल्याचे  जाणवल्याने लोक घराबाहेर पडले.(Sameer Sehgal/ Hindustan Times)

भूकंपानंतर नोएडामध्ये लोक त्यांच्या घराबाहेर जमलेले नागरिक . 
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

भूकंपानंतर नोएडामध्ये लोक त्यांच्या घराबाहेर जमलेले नागरिक . (@Salaria_Shikha1)

एका ट्विटर वापरकर्त्याने पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील इमारतीमध्ये क्रॅकचा अहवाल दिला. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

एका ट्विटर वापरकर्त्याने पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील इमारतीमध्ये क्रॅकचा अहवाल दिला. (@Ali_Abbas_Zaidi)

भूकंपाच्या केंद्राचे व्हिज्युअलायझेशन
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

भूकंपाच्या केंद्राचे व्हिज्युअलायझेशन(ANI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज