IPL 2024 : मुंबई इंडियन्सची अंतिम चारमध्ये जाण्याची शक्यता कमी, पाहा इतर संघाची स्थिती
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 : मुंबई इंडियन्सची अंतिम चारमध्ये जाण्याची शक्यता कमी, पाहा इतर संघाची स्थिती

IPL 2024 : मुंबई इंडियन्सची अंतिम चारमध्ये जाण्याची शक्यता कमी, पाहा इतर संघाची स्थिती

IPL 2024 : मुंबई इंडियन्सची अंतिम चारमध्ये जाण्याची शक्यता कमी, पाहा इतर संघाची स्थिती

Updated Apr 24, 2024 12:15 AM IST
  • twitter
  • twitter
  • 2024 Playoff Qualification Scenario: आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स ८ सामन्यांनंतर १४ गुणांसह लीग टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली जोस बटलर, यशस्वी, रियान परागने चांगली फलंदाजी करत आहेत. तर, गोलंदाजीत चहल आणि बोल्ट चांगली गोलंदाजी केली.राजस्थानने आणखी एक सामना जिंकला तर ते प्लेऑफमधील आपले स्थान पक्के करू शकतात. 
twitterfacebook
share
(1 / 5)

(AFP)
यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सही प्लेऑफमधील आपले स्थान पक्के करू शकते, असे दिसते. सुनील नारायण आणि फिल सॉल्ट कोलकात्याला चांगली सुरुवात करून देत आहेत. प्रत्येक सामन्यात कोलकात्याचे सलामीवीर सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणत आहेत. कोलकात्यांनी सात सामन्यांच्या अखेरीस १० गुणांची कमाई केली आहे. प्लेऑफसाठी १६ गुणांचे लक्ष्य असेल तर केकेआरला आणखी किमान तीन सामने जिंकावे लागतील. 
twitterfacebook
share
(2 / 5)

कोलकात्यापाठोपाठ प्लेऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता असलेला संघ म्हणजे सनरायडर्स हैदराबाद. सात सामन्यांनंतर त्यांचे ही १० गुण जमा झाले आहेत. पॅट कमिन्सने जर तीन सामने जिंकले तर तो प्लेऑफमधील आपले स्थान पक्के करू शकेल. मात्र, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड चांगली फलंदाजी करत आहेत
twitterfacebook
share
(3 / 5)

(ANI )
चौथा संघ म्हणून पहिल्या चारमध्ये कोण असेल, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी मिळू शकले. लखनौ विरुद्ध चेन्नई सामना जो जिंकेल तो प्लेऑफच्या शर्यतीत बराच पल्ला गाठू शकतो. कारण दोन्ही संघांचे सात सामन्यांनंतर ८ गुण आहेत. दुहेरी आकडी घरात आधी कोण पोहोचतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, धोनी ज्या फॉर्ममध्ये आहे, त्या फॉर्ममध्ये चेन्नईचा संघ पहिल्या चार मध्ये राहू शकतो.
twitterfacebook
share
(4 / 5)

आता मुंबई इंडियन्स किंवा गुजरात टायटन्ससारखे संघ शेवटी बाजी मारू शकतील का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. यादीत तळाशी असलेला संघ सर्वांना आश्चर्यचकित करून वर येऊ शकतो, तर अनेक संघ वरच्या स्थानावर असलेल्या संघाचा विजयी समीकरण बिघडवू शकतात. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज