मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kanpur Crime News : भांडी चोरली म्हणून दोस्तीत झाली कुस्ती; बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

Kanpur Crime News : भांडी चोरली म्हणून दोस्तीत झाली कुस्ती; बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 06, 2022 01:35 PM IST

Kanpur Crime News In Marathi : भांडी चोरली म्हणून एकानं आपल्याच मित्राला लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Kanpur Crime News In Marathi
Kanpur Crime News In Marathi (HT)

Kanpur UP Crime News : मैत्री कितीही घट्ट असो, त्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतच असतात. परंतु अनेकदा अनेक वर्षांची मैत्रीचं रुपांतर कट्टर शत्रुत्त्वात झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडला आहे. कारण भांडी चोरल्याच्या क्षुल्लक वादातून मित्रानं आपल्याच जिगरी मित्राची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांनी पाच तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील नजीराबादमध्ये राहणाऱ्या बलबीर यानं भांडी चोरल्याचा संशय त्याचा मित्र अंकुर याला झाला होता. त्यानंतर अंकुरनं बलबीरवर नजर ठेवायला सुरुवात केली. जेव्हा बलबीर हा समोरून आला तेव्हा अंकुरच्या पत्नीनं इशारा करताच अंकुरनं मित्र असलेल्या बलबीरवर लाकडी दांड्यानं हल्ला चढवला.

बलबीर ओरडत असतानाही अंकुरनं त्याला बेदमपणे मारहाण करतच होता. अंकुरनं केलेल्या मारहाणीत बलबीरचा जागीच मृत्यू झाला. परंतु हा सर्व प्रकार तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आरोपी अंकुर आणि त्याची पत्नी शालूला अटक केली आहे. अंकुर आणि बलबीर हे दोघे अनेक दिवसांपासूनचे मित्र आहेत. दोघेही फूटपाथवर राहत होते, याशिवाय शहरातील कचरा उचलण्याचं कामही दोघे सोबत करत होते. परंतु आता भांडी चोरल्याच्या कारणावरून जिगरी मित्रानंच बलबीरची हत्या केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग