Marathi Viral News Today : गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी प्रियकर काहीही करायला तयार असतो. सध्याच्या काळात प्रेयसीला भेटण्यासाठी अनेक लोक हजारो किलोमीटरचं अंतर कापतात. परंतु अनेकवेळा जोडपे भेटायला एकत्र आलेले असताना काही विचित्रच घडल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या घरी भेटायला गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडला भेटत असतानाच अचानक तिचे नातेवाईक आल्याने तरुणाला रेफ्रिजेटरच्या मागे लपावं लागलं. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत तरुणाची खिल्ली उडवली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, एक तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्याचवेळी अचानक तरुणीची आई, वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईक घरी आले. त्यामुळं जोडप्याची चांगलीच फजिती झाली. प्रकरणाचा भांडाफोड होवू नये, यासाठी तरुणीने बॉयफ्रेंडला फ्रीजमागे लपवलं. परंतु घरात कुणीतरी लपलेलं असल्याचं समजताच नातेवाईकांमध्ये एकच गदारोळ उडाला. त्यानंतर उपस्थित लोकांनी संबंधित तरुणाला फ्रीजच्या मागून शोधून काढलं. संतापलेल्या नातेवाईकांनी आपल्या मुलीसह तरुणाला खडेबोल सुनावले. सुदैवाने तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी तरुणाला मारहाण केली नाही.
प्रेमासाठी आरोपी तरुण गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्यानंतर झालेल्या राड्याचा व्हिडिओ देखील कुणीतरी शूट करत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी शेयर केलं असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी जायची काय गरज होती?, असा सवाल काही लोकांनी केला आहे. तर काही लोकांनी प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं म्हटलं आहे. त्यामुळं आता व्हायरल व्हिडिओवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहे.
संबंधित बातम्या