मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dombivli Crime News : चालत्या महिलेवर धारदार कैचीने वार, चोरट्यांनी मोबाईल अन् मंगळसूत्र पळवलं

Dombivli Crime News : चालत्या महिलेवर धारदार कैचीने वार, चोरट्यांनी मोबाईल अन् मंगळसूत्र पळवलं

Nov 05, 2023 06:22 PM IST

Dombivli Crime News : आरोपींनी महिलेवर प्राणघातक हल्ला करत मंगळसूत्र पळवल्याची थरारक घटना समोर आली आहे.

Dombivli Crime News Marathi
Dombivli Crime News Marathi (HT_PRINT)

Dombivli Crime News Marathi : ठाण्यात महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीतून संतापजनक घटना समोर आली आहे. रेल्वेतून प्रवास करत ट्रॅकवरून घरी परतणाऱ्या एका महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. आरोपी चोरट्यांनी महिलेवर धारदार कैचीने वार केले असून महिलेकडील स्मार्टफोन आणि मंगळसूत्र चोरून नेल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या प्रकरणात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संध्या नागराळ या रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी लालबहादूर बाकेलाल यादव याच्यासह अन्य तीन लोकांनी संध्या यांच्यावर कैचीने वार करण्यास सुरुवात केली. आरोपी मारहाण करत असल्याने संध्या यांनी आरडाओरड केली. परंतु त्याचवेळी आरोपींनी महिलेकडील मोबाईल आणि मंगळसूत्र चोरून नेले आहे. डोंबिवलीहून कोपरला महिला जात असताना ही घटना घडली आहे. त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपी लालबहादूर बाकेलाल यादव याला अटक केली आहे.

महिलेवर जीवघेणा हल्ला करत तिच्याकडील मोबाईल आणि मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीवर कलम ३९५ आणि १४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी रेल्वेस्टेशनसह परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता डोंबिवलीतही एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४