मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Khadse Heart Attack : एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी तातडीने मुंबईत दाखल

Eknath Khadse Heart Attack : एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी तातडीने मुंबईत दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 05, 2023 04:50 PM IST

Eknath Khadse Health News : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Eknath Khadse Heart Attack
Eknath Khadse Heart Attack (HT)

Eknath Khadse Heart Attack : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. खडसे हे जळगावातील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला आहे. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना उपचारासाठी एअर अँम्ब्यूलन्सने मुंबईत दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा दौऱ्यावर असून त्यांनी एकनाथ खडसेंना मुंबईत आणण्यासाठी विशेष एअर अँम्ब्यूलन्सची व्यवस्था करून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार एकनाथ खडसे हे एक कार्यक्रम आटोपून जळगावातील निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आज दुपारी त्यांना अचानक छातीत त्रास व्हायला लागला. यावेळी एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच त्यांच्या कुटुंबियांना त्यांना जळगावातील गजानन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचार सुरू असातनाच रोहिणी खडसे यांनी खडसेंना हार्ट अटॅक आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंना तातडीने मुंबईत आणण्यासाठी एअर अँम्ब्यूलन्सची व्यवस्था करून दिली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत होता. त्यानंतर आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता खडसेंना उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी पुजाअर्जा सुरू केली आहे.

IPL_Entry_Point