मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mathura : मित्रांसोबत सेक्स करण्यासाठी प्राध्यापकाची पत्नीला मारहाण; पीडित महिलेची पोलिसांत तक्रार

Mathura : मित्रांसोबत सेक्स करण्यासाठी प्राध्यापकाची पत्नीला मारहाण; पीडित महिलेची पोलिसांत तक्रार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 11, 2023 03:56 PM IST

Mathura Crime News : आरोपी पती आपल्याच पत्नीला मित्रांसह नातेवाईकांसोबत लैंगिक संबंध प्रस्तापित करण्यासाठी दबाब टाकत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Mathura Uttar Pradesh Crime News
Mathura Uttar Pradesh Crime News (HT_PRINT)

Mathura Uttar Pradesh Crime News : आपल्याच जोडीदाराला मारहाण करत तिला मित्र आणि नातेवाईकांसोबत लैंगिक संबंध प्रस्तापित करण्यासाठी पती दबाब टाकत असल्याचा आरोप करत पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशातील मथुरेत खळबळ उडाली असून त्यानंतर आता महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याशिवाय पोलिसांकडून आरोपीचे मित्र आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातल्या धर्मनगरीमध्ये पती इतरांशी लैंगिक संबंधासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करत नीलम चौधरी या महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची गंभीरतेनं दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नीलम चौधरी या महिलेनं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझा पती मथुरेतील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मला मित्रांसह नातेवाईकांशी लैंगिक संबंध प्रस्तापित करण्यासाठी दबाव टाकत असून त्याचा विरोध केला असता पतीनं मारहाण केल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर आता पीडित महिलेनं पतीवर कारवाईची मागणी केल्यानंतर घटस्फोटाचाही अर्ज दाखल केला आहे.

इतरांशी सेक्स करण्यासाठी पतीची पत्नीला मारहाण....

आरोपी पती हा सातत्यानं चारित्र्याविषयी संशय घेत असून इतरांशी सेक्स करण्यासाठी सतत मारहाण करत असल्याचा आरोप पीडित महिला नीलम चौधरी यांनी केला आहे. याशिवाय आरोपीनं महिलेच्या माहेरच्या लोकांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडित महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय मथुराच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही पीडित महिलेशी चर्चा केली असून तिला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

IPL_Entry_Point