मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jalebi Baba : महिलांवर बलात्कार करताना व्हिडिओ शूट करायचा; नराधम जलेबी बाबाच्या कृत्याचा भांडाफोड

Jalebi Baba : महिलांवर बलात्कार करताना व्हिडिओ शूट करायचा; नराधम जलेबी बाबाच्या कृत्याचा भांडाफोड

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 11, 2023 01:09 PM IST

Haryana Rape Case : आरोपी जलेबी बाबा हा महिलांना चहामध्ये गुंगीचं औषध देऊन बलात्कार करत होता. पीडित महिलांनी मोठं धैर्य दाखवत त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर आता पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Balaknath Dera Haryana Rape Case
Balaknath Dera Haryana Rape Case (HT_PRINT)

Balaknath Dera Haryana Rape Case : महिलांना चहामध्ये गुंगीचं औषध देऊन बलात्कार करणाऱ्या हरयाणातील जलेबी बाबाच्या कृत्याचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. आरोपी जलेबी बाबानं आतापर्यंत तब्बल १२० महिलांचा बलात्कार केला असल्याचा खुलासा पोलीस तपासात झाल्यानंतर आता देशभरात खळबळ उडाली असून त्यानं न्यायालयानं आरोपी जलेबी बाबाला कारावाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळं आता धर्माच्या नावानं बलात्काराचा उच्छाद मांडणाऱ्या आरोपी जलेबी बाबाला कोर्टानं कठोर शिक्षा सुनावल्यानंतर पीडित महिलांनी न्याय मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालकनाथ डेऱ्यात राहणारा जलेबी बाबा हा हरयाणात चांगलाच प्रसिद्ध होता. राज्यातील अनेक महिला या त्याच्याकडे उपचारासाठी येत असल्यामुळं तो महिलांना एका बंद खोलीत नेऊन त्यांना गुंगीचं औषध दिलेलं चहा प्यायला द्यायचा. त्यानंतर महिला बेशुद्ध झाल्यानंतर तो महिलांवर बळीजबरीनं बलात्कार करायचा. त्यावेळी त्याचे समर्थक डेऱ्याबाहेर शस्त्र घेऊन उभे असल्यामुळं पीडित महिलांनी या घटनेची वाच्यता कुणाशीही केलेली नाही. जलेबी बाबानं गेल्या वर्षभराच्या काळात तब्बल १२० महिलांवर बलात्कार केला. त्यापैकी सहा महिलांनी मोठ्या हिंमतीनं त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करत जलेबी बाबा विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यानतंर त्याच्याविरोधात कोर्टात सुनावणी सुरू झाली होती.

महिलांचे व्हिडिओ काढून करायचा ब्लॅकमेल...

महिलांवर करताना जलेबी बाबानं सेक्स करतानाचा व्हिडिओ शूट करायचा. अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडित महिलांना आणखी महिलांना डेऱ्यात घेऊन येण्यासाठी ब्लॅकमेल करत होता. त्यामुळं आता पोलिसांनी जलेबी बाबाला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमधील सर्व अश्लिल व्हिडिओंची चौकशी सुरू केली आहे.

कोर्टानं सुनावली १४ वर्षांची शिक्षा...

हरयाणातील १२० महिलांचा बलात्कार करून त्यांचे व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी कोर्टानं जलेबी बाबाला तब्बल १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टातील न्यायाधीशांनी शिक्षा सुनावल्यानंतर जलेबी बाबाला कोर्टातच रडू लागला. त्यावेळी बाबानं न्यायाधीशांसमोर दयेची भीकही मागण्यास सुरुवात केली. परंतु सुरक्षारक्षकांनी त्याला कोर्टातून बाहेर नेत त्याची कारागृहात रवानगी केली.

IPL_Entry_Point