मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Who Is DK Shivakumar : रिसॉर्ट पॉलिटिक्सचे जनक आणि काँग्रेसचे संकटमोचक, कोण आहेत डीके शिवकुमार?

Who Is DK Shivakumar : रिसॉर्ट पॉलिटिक्सचे जनक आणि काँग्रेसचे संकटमोचक, कोण आहेत डीके शिवकुमार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 13, 2023 07:44 PM IST

Who Is DK Shivakumar : कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयात डीके शिवकुमार यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांशी कायम संपर्क असल्यामुळं ते नेहमीच चर्चेत असतात.

Karnataka Congress president DK Shivakumar speaks during a press conference, in Bengaluru. (PTI)
Karnataka Congress president DK Shivakumar speaks during a press conference, in Bengaluru. (PTI) (HT_PRINT)

Who Is DK Shivakumar : कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपाने ६१ तर जेडीएसने १९ जागा जिंकल्या आहे. परंतु आता काँग्रेसच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. भारत जोडो यात्रेतील नियोजन तसेच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी डीके शिवकुमार यांनी केलेली होती. अनेकदा पक्ष अडचणीत असताना डीके शिवकुमार यांनी काँग्रेससाठी संकटमोचकाची भूमिका बजावली होती. त्यामुळं आता काँग्रेससाठी संकटमोचक असणारे आणि रिसॉर्ट पॉलिटिक्सचे जनक असलेले डीके शिवकुमार हे कोण आहेत?, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जाणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले डीके शिवकुमार हे कर्नाटकातील कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते सतत आमदारपदावर निवडून येत आहे. यंदाच्या निवडणुकीत आठव्यांदा निवडून आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय अशी शिवकुमार यांची ओळख आहे. डीके शिवकुमार हे केवळ राजकारणी नाही तर शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. त्यामुळं राजकारण क्षेत्राशिवाय अन्य क्षेत्रातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. भाजपने कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी डीके शिवकुमार यांनी पहिल्यांदा आमदारांना कर्नाटकाबाहेर रिसॉर्टमध्ये हलवलं होतं.

कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून डीके शिवकुमार यांची ओळख आहे. त्यांच्याकडे ८४० कोटींहून अधिकची संपत्ती असल्याची माहिती आहे. काँग्रेसला जेव्हा-जेव्हा निधीची आवश्यकता असते तेव्हा देखील डीके शिवकुमार हे पक्षाला निधी देण्याचं काम करत असतात. गेल्या काही दिवसांपासून एका आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात डीके शिवकुमार यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.

IPL_Entry_Point