मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: अँकर बातम्या सांगत असतानाच न्यूजरूम हादरला; पाकिस्तानातील भूकंपाचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: अँकर बातम्या सांगत असतानाच न्यूजरूम हादरला; पाकिस्तानातील भूकंपाचा व्हिडिओ व्हायरल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 22, 2023 03:37 PM IST

Pakistan Earthquake Viral Video: पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री उशीरा ६.८ तीव्रतेचा भूंकपाचे धक्के जाणवले.

Pakistan Earthquake
Pakistan Earthquake

Pakistan TV Anchor Video: भारतासह अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.८ नोंदवण्यात आली. या भूकंपात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. याचदरम्यान, पाकिस्तानमधील टीव्ही अँकरचा भूंकपदरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक टीव्ही अँकर बातम्या वाचताना दिसत आहे. मात्र, त्याच्यामागे संपूर्ण न्यूजरूमदेखील हालताना दिसत आहे. @MeghUpdates नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.नेटकरी या व्हिडिओमधील अँकरच्या संयम आणि शौर्याचे कौतुक करत असून तो व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भारताची राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तानच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भारत, पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.भूकंपाचे धक्के इतके मोठे होते की अनेक घरे कोसळली. उंच इमारतींमधील लोक घरातून बाहेर आले आणि बराच वेळ भूकंपानंतर जाणवणाऱ्या धक्क्यांच्या भितीने बाहेरच होते.

IPL_Entry_Point

विभाग