मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Union Budget 2023 Live : सात लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांची आयकरातून सूट

Union Budget 2023 Live : सात लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांची आयकरातून सूट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 01, 2023 12:29 PM IST

Union Budget 2023 : मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. जाणून घेऊया ठळक अपडेट्स…

Union Budget 2023 Live
Union Budget 2023 Live

आज मोदी सरकारचा दुसऱ्या पर्वातील निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.  पुढच्या वर्षी निवडणुका असल्यानं आजच्या अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. करदाते, गुंतवणूकदार, शेतकरी यांच्या या अर्थसंकल्पाकडून  मोठ्या अपेक्षा आहेत. शिवाय पर्यावरणपूरक योजना घोषित होण्याचीही शक्यता आहे. गृहिणींना आणि नोकरदार महिला वर्गाला मोदी सरकारच्या पेटाऱ्यातून काय मिळणार हे ही पाहावं लागेल. जाणून घेऊयात आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची सर्व माहिती केवळ एका क्लिक वर. 

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ लाईव्ह अपडेट्स:

मध्यम वर्गांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली. आता सात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या  कर्मचाऱ्यांना कोणाताही कर भरावा लागणार नाही.

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा ४.५ लाखांवरून ९ लाख करण्यात येणार आहे.
  • या वर्षी ६.५ हजार कोटींचे रिटर्न यावर्षी पूर्ण करण्यात आले आहेत. ४५ टक्के रिटर्न्स फक्त २४ तासांत पूर्ण करण्यात आले
  • बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक वस्तू स्वस्त होणार. अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा
  • देशात मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली असून मोबाईल फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी आली. बॅटरीजवरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी करण्यात आली.
  • महिलांसाठी नव्या बचत योजनेची केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली. ही योजना दोन वर्षांसाठी असेल.  महिला बचत योजनेत दोन लाखांपर्यंत बचतीची सूट देण्यात आली.
  • लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी ९ हजार कोटींची क्रेडिट गॅरंटी देणार
  • २०१४ पासून उभारण्यात आलेल्या १५७ वैद्यकीय महाविद्यालयांच्या जवळच १५७ नवी परिचारिका महाविद्यालये उभारली जाणार.
  • खुले स्रोत, खुले मापदंड,आंतर क्रियाशील सार्वजनिक मालमत्ता म्हणून शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार केल्या जातील. सर्वसमावेशक शेतकरी-केंद्रीत उपाययोजना सक्षम होतील आणि कृषी निविष्ठा, बाजारविषयक माहिती,कृषी उद्योग आणि नवंउद्योगांसाठी(स्टार्टअप्समध्ये) पाठबळ उपलब्ध होईल.
  • मच्छिमार,मच्छी विक्रेते आणि सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या सक्षमीकरणा साठी, मूल्य साखळीची क्षमता सुधारण्यासाठी आणि बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी पी एम मत्स्य संपदा योजनेची नवी उप योजना आणणार, यासाठी ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक नियोजित
  • आर्थिक क्षेत्रांमध्ये ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी आम्ही हरित इंधन, हरित ऊर्जा इत्यादी कार्यक्रम राबवत आहोत. या हरित वाढीच्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता कमी होण्यास मदत होते आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटलं.
  • पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाची मर्यादा २० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.पीएम मत्स्य संपदा योजनेची एक नवीन उप-योजना सुरू करण्यात येणार आहे, ज्यामध्ये ६००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य आहे.
  • भाषा, भौगोलिक आणि शैलींमधील दर्जेदार पुस्तकांच्या उपलब्धतेसाठी मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. राज्ये भौतिक ग्रंथालये स्थापन करतील आणि ग्रंथालय संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी इन्फ्रा प्रदान करतील
  • अभिनव अध्यापनशास्त्र, सतत व्यावसायिक विकास आणि आयसीटी अंमलबजावणीद्वारे शिक्षकांच्या प्रशिक्षणाची पुनर्रचना केली जाईल; जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांना उत्कृष्ट संस्था म्हणून विकसित केले जाईल
  • भविष्यातील वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उच्च उत्पादन आणि संशोधनासाठी कुशल मनुष्यबळ सुनिश्चित करण्यासाठी संस्थांमध्ये वैद्यकीय उपकरणांसाठी समर्पित बहु-विषय अभ्यासक्रम राबवले जाईल.
  • फार्मास्युटिकल्समधील संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम उत्कृष्टता केंद्रांद्वारे हाती घेण्यात येणार आहे. उद्योगांनाही प्राधान्य क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
  • सरकारी आणि सरकारी संस्थांमधील कंत्राटातील वादविवाद दूर करण्यासाठी विवाद से विश्वास योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार
  • कंपन्यांचा PAN क्रमांक विविध सरकारी सुविधांसाठी वापरला जाणार आहे. एकच माहिती विविध सरकारी संस्थांना वेगवेगळी द्यावी लागू नये, यासाठी एकच डेटाबेस निर्माण केले जाईल.
  • पीएम आवास योजनेला बळ देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या योजनेच्या आर्थिक तरतूदीमध्ये ६६ टक्के वाढ करण्यात आली आहे. या योजनेसाठी ७९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली.
  • देशात नवीन ५० विमानतळे उभारले जाणार.
  • स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ११.७ कोटी स्वच्छतागृह बांधली गेली
  • एलपीजी उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ९.६ कोटी घरांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचले.
  • केंद्र सरकारकडून २.४ लाख कोटी देण्यात आले आहेत. रेल्वेसाठी २.४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 
  • शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं देशानं लक्षणीय प्रगती केली आहे. स्वच्छ भारत, पीएम सुरक्षा विमा योजना, थेट लाभ हस्तांतरण आणि जन धन खात्याच्या माध्यमातून अनेक मैलाचे टप्पे पार केले आहेत.
  • केंद्र सरकार येत्या तीन वर्षात एकलव्य शाळांसाठी ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती करणार आहे.
  • मत्स्य व्यावसायासाठी मोठे पॅकेज दिले जाणार आहे.
  • देशातल्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहे. कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. बांधावरच्या शेतकऱ्यांना डिजिटल बळ दिले जाईल. कृषिपुरक योजनांना बळ दिले जाईल
  • सरकारी आणि छोट्या संस्थांना स्वस्ताला विकसित करण्यासाठी मोठा निधी दिला जाणार आहे.
  • कोरोना महामारीच्या काळात कोणताही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची आम्ही काळजी घेतली. २८ महिन्यात ८० कोटी लोकांना मोफत धान्य पुरवण्यात आले. येत्या एक वर्षात दोन लाख कोटी रुपये खर्च करून गरजू कुटुंबांना मोफत धान्य देऊ. २०१४ पासून, आमच्या प्रयत्नांमुळे लोकांचे जीवन सुधारले आहे.
  • कोरोना काळात थेट लाभार्थीच्या खात्यात मदतीची रक्कम देण्यात आली. युपीआय आणि कोविन अॅपमुळे जगभरात भारताचे महत्व वाढले- सीतारामन 
  • कोरोना महामारीच्या काळात भारतात १०२ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविड आणि युद्ध यांच्या पार्श्वभूमवीरही अर्थव्यवस्था स्थिर आहे. आम्ही जागतिक आव्हाने स्वीकारण्यासाठी लोककेंद्रित अजेंडा सादर करत आहोत- निर्मला सीतारामन
  • जी-२० चे अध्यक्षपद मिळवणे भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे- निर्मला सीतारामन
  • जगाच्या ७५व्या वर्षात जगाने भारताची ताकद ओळखली, जगभर मंदी असतानाही भारत घट्ट पाया रोवून उभा राहिला.जागतिक मंचावर भारताचे महत्व वाढलं. भारताच्या विकास आपण राबवलेल्या अनेक योजना यशस्वी ठरल्या आहेत, ज्याची जगानेही दखल घेतली- निर्मला सीतारामन
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पात कोणाकोणाला दिलासा मिळणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.  लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत देशाचे अर्थसंकल्प सादर करतील.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसद भवनात पोहोचले असून काही वेळातच मंत्रिमंडळाची बैठक सुरूवात होईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत.
  • देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाचं लाईव्ह स्ट्रिमिंग भारत सरकारच्या https://www.indiabudget.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. याशिवाय, केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही हिंदुस्थान टाईम्स मराठीच्या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
  • देशाच्या राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात पोहचल्या आहेत. निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करतील.
  • अर्थसंकल्पच्या पार्श्वभूमीवर काल जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात भारताचा जीडीपी ६-६.५% च्या दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जीडीपी वाढीचा वेग हा कमी असला तरी जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी आपली भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. कोविड- १९ च्या साथीच्या आजारातून भारतीय अर्थव्यवस्था आता पूर्णपणे बाहेर आली असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
  • केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण प्रकल्पांच्या तरतूदीत १० ते १२ टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता.
  • देशाचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनात दाखल झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी सादर होणारा मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थव्यवस्थेचा संथ वेग आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता आहे.
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने मंगळवारच्या सत्रात सावध पवित्रा घेतला होता.
  • यंदाच्या अर्थसंकल्पात कररचनेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या २.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत आहे. २.५ लाख ते ५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर लागतो. पण आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा मिळण्यासाठी शक्यता आहे. अर्थसंकल्पात 5 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाऊ शकते.
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज (१ फेब्रुवारी २०२३) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे आजच्या अर्धसंकल्पात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
  • Parliament Budget Session: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला  सुरुवात झाली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण या २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग