मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात उमर खालिद आणि खालिद सैफी निर्दोष; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात उमर खालिद आणि खालिद सैफी निर्दोष; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 03, 2022 04:48 PM IST

Umar Khalid and Khalid Saifi : जेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिद आणि खालिद सैफी यांना दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी कोर्टानं निर्दोष ठरवलं आहे.

Umar Khalid and Khalid Saifi
Umar Khalid and Khalid Saifi (HT)

Umar Khalid and Khalid Saifi : जेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिद आणि खालिद सैफी यांना दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी कोर्टानं निर्दोष ठरवलं आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये ते जामीनावर असून त्यांना यूएपीए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. उमर खालिद आणि खालिद सैफी यांना निर्दोष ठरवण्याचा निकाल न्या. पुलस्त्य प्रमाचला यांनी दिला असून लवकरच निकालाची प्रत कोर्टाकडून जारी करण्यात येणार आहे.

२०२० साली दिल्लीत झालेल्या हिंसाचारात ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचाराला सीएए कायद्याविरोधात आंदोलनाची पार्श्वभूमी होती. महाराष्ट्रातील अमरावतीत उमर खालिदनं केलेल्या भाषणामुळं दिल्लीत हिंसा भडकल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर खालिदवर यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. गेल्या अडीच वर्षांपासून उमर खालिद तुरुंगात आहे. सध्या कोर्टानं दिल्ली हिंसाचार प्रकरणात उमर खालिदला दिल्ली हिंसाचार प्रकरणात कोर्टानं निर्दोष ठरवलं असलं तरी त्याच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळं त्याचा तुरुंगवास कायम राहणार आहे.

कोर्टानं दिलेल्या निकालानंतर खालिद सैफी यांच्या पत्नीनं माध्यमांशी संवाद साधत अडीच वर्षानंतर मोठा विजय मिळाल्याचं म्हटलं आहे. आम्ही संविधानावर विश्वास ठेवला, त्यामुळं आम्हाला न्याय मिळाल्यानं आनंदी आहोत. पोलिसांनी केलेले निराधार आरोप कोर्टात खोटे सिद्ध झाल्याचं नरगिस सैफी म्हणाल्या.

IPL_Entry_Point

विभाग