मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sea Bullet Train : समुद्रातून धावणार सुपरफास्ट बुलेट ट्रेन; निविदा मागवल्या, लवकरच कामाला सुरुवात

Sea Bullet Train : समुद्रातून धावणार सुपरफास्ट बुलेट ट्रेन; निविदा मागवल्या, लवकरच कामाला सुरुवात

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 24, 2022 09:24 AM IST

Bullet Train Under Sea Tunnel : भारतात पहिल्यांदाच अरबी समद्राच्या पाण्यातून बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळं लोकांना हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, याचं वेध लागलं आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project
Mumbai-Ahmedabad Bullet Train Project (HT)

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : अरबी समुद्राच्या तळात बोगदा उभारून त्यात बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटातल्या भूमिगत स्थानकादरम्यान हे काम केलं जाणार आहे. त्यामुळं आता नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडनं या कामासाठी निविदा काढल्या असून लवकरच या कामाचं सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात एकूण सात किलोमीटरचा अंडरवॉटर बोगदा तयार करण्यात येईल. त्यामुळं आता देशात पहिल्यांदाच सुरू होत असलेली बुलेट ट्रेन समुद्राखालून धावणार आहे. 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' आणि टनेल बोरिंग मशीनचा वापर करून पाण्याखालील बोगद्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळं आता या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार असल्यानं हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, याचं लोकांना वेध लागलं आहे.

दरम्यान राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती आली आहे. जपान सरकारच्या सहकार्यानं या प्रकल्पाचं काम केलं जात असून या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र सरकार अर्थसहाय्य करत आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्याचं समजतं.

IPL_Entry_Point