मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress President : कॉँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, तीन दिग्गज प्रमुख दावेदार

Congress President : कॉँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, तीन दिग्गज प्रमुख दावेदार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 24, 2022 08:30 AM IST

Congress President Election : कॉँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया ३० सप्टेंबर पर्यन्तसुरू राहणार आहे.

अशोक गेहेलोत - शशी थरूर
अशोक गेहेलोत - शशी थरूर

दिल्ली : गेल्या कही दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रियेला आज पासून सुरू होणार आहे. या साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यन्त उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अद्याक्ष पदाच्या शर्यतीत अशोक गेहेलोत, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कॉँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्षपदाबाबत कॉँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे चित्र होते. एक गट हा राहुल गांधी यांच्या बाजूने होता तर दूसरा गट हा बिगर गांधी घरण्यातील अध्यक्ष असावा या बाजूने होता. अखेर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाबाबत निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आज पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३० तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या नंतर निवडणूक होऊन कॉँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे.

अध्यक्ष पदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहे. अशोक गेहेलोत यांना जर अध्यक्ष व्हायचे असेल तर त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. कॉँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद हे धोरण असून त्या धोरणामुळे त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गेहेलोत यांनी राजीनामा दिल्यास राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवणार आहे. यामुळे सध्यातरी गेहेलोत हे अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्यांना माजी परराष्ट मंत्री शशी थरूर यांचे आव्हान असणार आहे. थरूर यांनी सोनिया गांधी यांची परवानगी घेऊन निवडणूक उमेदवारी अर्ज भरला आहे. थरूर हे गांधी यांच्या विश्वासू असलेल्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांचे तगडे आव्हान गेहेलोत यांना असणार आहे. थरूर यांच्या सोबत अध्यक्ष पदासाठी तिसरे नाव देखील चर्चेत आहेत. मनीष तिवारी हे देखील या शर्यतीत असणार आहे. यामुळे अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. ३० तारखेनंतर या बाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग