मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Salman Khan : सलमान खानला पुन्हा गँगस्टर गोल्डी ब्रारच्या धमकीचा मेल; 'पुढच्या वेळी करणार मॅटर क्लोज...'

Salman Khan : सलमान खानला पुन्हा गँगस्टर गोल्डी ब्रारच्या धमकीचा मेल; 'पुढच्या वेळी करणार मॅटर क्लोज...'

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 20, 2023 07:42 AM IST

Lawrence Bishnoi : प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला पुन्हा धमकीवजा ईमेल आला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांचे टेंशन वाढले आहे. सिद्धू मुसेवाला याची हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि गँगस्टर गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई यांनी सलमान खानला या पूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Salman Khan Death Threat
Salman Khan Death Threat (AFP)

मुंबई : सिद्धू मुसेवाला याची हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि गँगस्टर गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई यांनी अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच खंडणीची मागणी देखील केली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती, दरम्यान, मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली होती. मात्र, ही घटना ताजी असतांना पुन्हा सलमान खान याला जीवे मारण्याचा धमकी वजा ई मेल आल्याने खबळल उडाली आहे. या मुळे सलमान खानचे कुटुंबीय चांगलेच हादरले आहे. सलमान खान याला काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर १८ मार्च रोजी हा मेल आला आहे. यात मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा कर, नाहीतर पुढच्या वेळी झटका दिला जाईल अशी धमकी सलमान खान याला दिली आहे. रोहित गर्ग नावाच्या आयडीवरुन हा धमकीचा मेल आला आहे. यात गँगस्टर गोल्डी ब्रारची नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानचंय सुरक्षेत आणखी वाढ केली असून खबरदारीचा उपाय म्हणून त्याला सार्वजनिक कार्यक्रमांपासून सुरू राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या ईमेलचा शोध घेत आहेत. गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले असता त्यांना धमकीचे पत्र मिळाले होते. यात सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करणार अशी धमकी देण्यात आली होती. या मागे गोल्डी गोल्डी ब्रार असल्याचे पुढे आले होते.

दरम्यान, सलमान खानला मिळालेल्या धमकी वजा ईमेल मध्ये लिहिले आहे की, मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा कर, नाहीतर पुढच्या वेळी झटका दिला जाईल.

IPL_Entry_Point

विभाग