मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tejasvi Surya : भाजपच्या स्टार प्रचारकांचा यादीतून तेजस्वी सूर्या बाहेर; ‘नफरती चिंटू…’ म्हणत कॉँग्रेसची टीका

Tejasvi Surya : भाजपच्या स्टार प्रचारकांचा यादीतून तेजस्वी सूर्या बाहेर; ‘नफरती चिंटू…’ म्हणत कॉँग्रेसची टीका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 20, 2023 11:57 AM IST

Tejasvi Surya : इंडिगो विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडणारे दक्षिण बेंगळुरूचे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांना भाजपने कर्नाटक निवडणुकीच्या स्टार प्रचारकाच्या यादीतून बाहेर केले आहे. भाजपच्या स्टार प्रचारक नाहीत. या दरम्यान, सूर्या यांना ‘नफ्रती चिंटू…’ म्हणून कॉँग्रेसने डिचवले आहे.

Tejasvi Surya
Tejasvi Surya

Tejasvi Surya : दक्षिण बेंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांना भाजपने कर्नाटक निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. तेजस्वी सूर्या राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ आणि भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. प्रखर हिंदुत्वादी म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सूर्या हे त्रिपुरानिवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक होते. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीतून त्यांना प्रचारकाच्या यादीतून वगळल्याने कॉँग्रेसने त्यांच्यावर टीका करत सूर्या यांना ‘नफ्रती चिंटू…’ संबोधत डिचवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा रोखली; कार्यकर्त्यांची धरपकड!

तेजस्वी सूर्या यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर सुदानमधील कन्नडांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर हल्ला केला होता. सूर्या यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली होती. मात्र, त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. पीएम मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, हिमंता बिस्वा सरमा, देवेंद्र फडणवीस, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन आदींचा भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

Pune Sppu Rap Song Shoot : रॅप सॉंग शुटींग विरोधात पुणे विद्यापीठानं नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

दरम्यान, तेजस्वी सूर्या यांना ‘नफ्रती चिंटू…’ असे संबोधत काँग्रेसने टीका केली आहे. सूर्या यांच्या राज्यात त्यांची कुणी पर्वा करत नाही, असे कॉँग्रेसनं म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून सचिन पायलट यांचे नाव वगळण्यात आले आहे. कारण त्यांनी राजस्थानमध्ये स्वतःच्या सरकारच्या विरोधात उपोषण केले.

Stampede in Yemen capital: : यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; ७९ जणांचा मृत्यू

तेजस्वी सूर्या हे काही दिवसांपूर्वी एका खास कारणामुळे चर्चेत आले होते. इंडिगो विमानातून प्रवास करत असतांना त्यांनी विमानाचा आपत्कालीन दरवाजा चुकून उघडल्यामुळे ते वादात सापडले होते. त्यांच्या या वागणुकीमुळे फ्लाइटला उशीर झाला आणि याचा त्रास इतर प्रवाशांना सहन करावा लागला होता. त्यांचे सहप्रवासी तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी दावा केला की तेजस्वीच्या लक्षात आलेली चूक होती, ती दुरुस्त केली आणि नंतर विलंबाबद्दल प्रवाशांची त्यांनी माफी मागितली.

व्यवसायाने वकील, तेजस्वी यांची वयाच्या २८ व्या वर्षी लोकसभेवर निवडून गेले. २०१९ मध्ये, तेजस्वी यांची माजी मंत्री अनंत कुमार यांच्या पत्नी एवजी बेंगळुरू दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तेजस्वी सूर्या यांना संधी देण्यात आली. अनंत कुमार यांनी १९९६ ते २०१८ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

IPL_Entry_Point

विभाग