मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sleeper Coach in Vande Bharat : वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणार स्लीपर कोचची सुविधा, वाचा सविस्तर

Sleeper Coach in Vande Bharat : वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणार स्लीपर कोचची सुविधा, वाचा सविस्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 20, 2023 07:29 PM IST

vande bharat train : वंदे भारत ट्रेनमध्ये आता स्लीपर कोचची सुविधा असणार आहे. प्रतितास २२० किमी वेगाने धावू शकतील अशी कोचची डिझाईन केली जात आहे.

Sleeper Coach in Vande Bharat
Sleeper Coach in Vande Bharat

Vande Bharat Express Sleeper Coach Facility : देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या संख्येत वाढ होत आहे. वंदे भारत देशातील सर्वात वेगवान रेल्वे गाड्यांपैकी एक आहे. भारतीय रेल्वे सेमी-हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्रवाशांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये आता स्लीपर कोचची सुविधा देण्यात आली आहे. कारण वंदे भारत ट्रेनच्या  स्लीपर  व्हर्जनचे २२० किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्यासाठी खास डिजाइन केले जाईल. वंदे भारतच्या  स्लीपर व्हर्जन ट्रेनमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकाल. 

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता वंदे भारत ट्रेनची स्लीपर आवृत्ती २२० किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्यासाठी डिझाइन केली जाईल. वास्तवात अॅल्युमिनियम-निर्मित स्लीपर आवृत्ती ट्रेन ट्रॅकवर २०० किमी प्रतितास वेगाने धावतील. चेअर कार वंदे भारत एक्सप्रेस गाड्या टप्प्या टप्प्याने  शताब्दी एक्सप्रेसने बदलल्या जातील, तर स्लीपर आवृत्ती राजधानी एक्सप्रेस गाड्यांना पर्याय असेल.

दुसऱ्या टप्प्यात २०० वंदे भारत ट्रेन स्लीपर असतील आणि त्या अॅल्युमिनियमच्या असतील. ज्या जास्तीत जास्त २०० किमी प्रतितास वेगाने धावतील. यासाठी दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता रेल्वेच्या ट्रॅकची दुरुस्ती केली जात आहे, सिग्नल यंत्रणा, पूल निश्चित केले जात आहेत आणि कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. जे लवकरच पूर्ण होईल.

यासाठी पुढील दोन वर्षात तामिळनाडूमधील चेन्नई येथे ICF, महाराष्ट्रातील लातूर रेल्वे कारखाना आणि हरियाणातील सोनीपत येथे ४०० गाड्यांचे उत्पादन केले जाईल.

IPL_Entry_Point