मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  J P Nadda: संजय राऊत जे बोलत होते, तेच भाजपाध्यक्षांच्या ओठावर, म्हणाले...

J P Nadda: संजय राऊत जे बोलत होते, तेच भाजपाध्यक्षांच्या ओठावर, म्हणाले...

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 01, 2022 11:33 AM IST

J P Nadda on Shiv Sena: विकासाला भाजप हा समानार्थी शब्द आहे. आता एक देश, एक झेंडा, एक विचार असल्याचंही भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा

JP Nadda on Shivsena: राज्यात गेल्या महिन्याभरात शिवसेनेत बंडानंतर अनेक उलथापालथी झाल्या. बंडाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या शिवसेनेला आता आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. एका बाजुला ईडीची कारवाई सुरू असताना दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

भाजपला शिवसेना संपवायची आहे असा आरोप सातत्यानं संजय राऊत यांच्यासह अनेकांनी केला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या वक्तव्यानं यास एक प्रकारे दुजोराच दिल्याचं बोललं जात आहे. भाजपशी सामना करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, राज्यात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा नड्डा यांनी केला आहे. ते बिहारमध्ये भाजपच्या १६ कार्यालयांच्या उद्घाटन समारंभावेळी बोलत होते.

काँग्रेस आता सर्व राज्यांमधून संपत चालली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा कौटुंबिक पक्ष आहे. बिहारमध्ये राजदविरोधात आम्ही लढतोय, तो कौटुंबिक पक्ष आहे. ओडिशात नवीन बाबू पार्टी ही एका व्यक्तीची पार्टी आहे. महाराष्ट्रात शिवसेना जी आता संपण्याच्या मार्गावर आहे तीसुद्धा कौटुंबिक पार्टी आहे असं नड्डा म्हणाले. 

काँग्रेसवर टीका करताना जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेस फक्त बहिण भावांचा पक्ष राहिला आहे. लढा बांधिलकीतून असते आणि याच बांधिलकीतून ताकद जन्माला येते. भाजप हा सर्वसामान्य जनतेशी जोडला गेलेला पक्ष आहे. कालची रॅलीच भाजपची ताकद कशी वाढतेय ते सांगत आहेत.

विकासाला भाजप हा समानार्थी शब्द आहे. आता एक देश, एक झेंडा, एक विचार आहे. आम्ही कार्यालय म्हणतो ऑफिस नाही. कार्यालय हे संस्काराचं केंद्र असतं. कार्यालय संस्काराचं जिवंत उदाहरण आहे. कार्यालयात लोक संस्कार शिकतात असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.

IPL_Entry_Point