मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Spicejet flight मध्ये हवाई सुंदरीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप, विमानात गोंधळ, VIDEO

Spicejet flight मध्ये हवाई सुंदरीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप, विमानात गोंधळ, VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 24, 2023 12:24 AM IST

Ruckus in spicejet flight : स्पाइस जेट विमानात एका प्रवाशाने हवाई सुंदरीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर विमानात काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाली आहे.

Ruckus in spicejet flight
Ruckus in spicejet flight

दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानात बसलेल्या एका प्रवाशाने गोंधळ घातल्याचे आता समोर आले आहे. प्रवाशाने महिला क्रू मेंबरला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा गंभीर आरोप आहे. यासंदर्भात एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील या प्रवाशाने विमानातील महिला क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर हा प्रवासी आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाला विमानातूनखालीउतरवण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

एअरलाइनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, २३जानेवारी रोजी दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढताना एका प्रवाशाने महिला क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. तो महिला क्रू मेंबरला त्रास देत होता. महिला क्रू मेंबरने पीआयसी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.

क्रू मेंबरचा आरोप आहे की, प्रवाशाने तिला अयोग्य व अश्लील पद्धतीने स्पर्श केला. मात्र, हा निव्वळ अपघात होता, असा दावा अन्य काही प्रवाशांनी केला आहे. प्रवाशाने लेखी माफीही मागितली होती. मात्र त्याला विमानातून उतरवण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने या गोंधळाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

विमानातील या गोंधळाचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात एक वृद्ध हवाई सुंदरीवर ओरडताना दिसत आहे. महिला इंग्रजीत बोलते तेव्हा हा व्यक्ती त्या महिलेवर ओरडतो आणि तिला हिंदीत बोलण्यास सांगतो. यानंतर दुसरा प्रवासी या महिलेला समजावण्यासाठी येतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमानातील या गोंधळादरम्यान काही प्रवासीही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर विमानात बसलेल्या एअर होस्टेसने गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगितले व आपल्या सहकारी क्रू मेंबरला समजावले.

IPL_Entry_Point

विभाग