मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IB recruitment : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती ! तब्बल ७९७ अधिकाऱ्यांची पदे भरणार; असा करा अर्ज

IB recruitment : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती ! तब्बल ७९७ अधिकाऱ्यांची पदे भरणार; असा करा अर्ज

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 01, 2023 12:20 PM IST

IB recruitment : इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीच्या तब्बल ७९७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उद्या ३ जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून २३ जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

IB recruitment
IB recruitment

दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB) तब्बल ७९७ पदादांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), ग्रेड II (तांत्रिक) या पदासांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ३ जून २०२३ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २३ जून आहे. ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती टियर-१, टियर-२ आणि टियर-३ परीक्षेनंतर केली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Deccan Queen : डेक्कन क्वीन झाली ९३ वर्षांची; पुणे रेल्वे स्थानकात वाढदिवस साजरा

IB मध्ये ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसरच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागणार आहे.

इंटेलिजन्स ब्युरोच्या रिक्त जागांचा तपशील

अनारक्षित-३२५

EWS-७९

ओबीसी-२१५

एससी-११९

एसटी ५९

 

शैक्षणिक पात्रता

इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्समध्ये B.Sc किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बॅचलर डिग्री आवश्यक आहे.

वयो मर्यादा

१८ ते २७ वर्षांच्या दरम्यान.

अर्ज शुल्क

अनारक्षित, EWS आणि OBC साठी ५०० रूपये तर इतर जातीसाठी ४५० रु.

अर्जदाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. अर्जाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच २३ जून २०२३ रोजी वयाची गणना केली जाईल.

परीक्षा नमुना

IB ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर भर्तीसाठी एकूण १०० गुणांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. प्रत्येक प्रश्न १ गुणाचा असेल. लेखी परीक्षेत १/४ थीचे निगेटिव्ह मार्किंग असेल.

निवड प्रक्रिया

ऑनलाइन लेखी परीक्षा

कौशल्य चाचणी

मुलाखत

दस्तऐवज सत्यापन

वैद्यकीय तपासणी

IPL_Entry_Point

विभाग