मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वेमंत्र्यांनी राजेशाही थाटाच्या कोचचा फोटो शेअर करत विचारले, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, अंदाज लावा?"

रेल्वेमंत्र्यांनी राजेशाही थाटाच्या कोचचा फोटो शेअर करत विचारले, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, अंदाज लावा?"

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 31, 2023 11:10 PM IST

modern coaches for kalka Shimla train : रेल्वे मंत्र्यांनी बुधवारी ट्विटरवर रेल्वेच्या कोचचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, "कोणती ट्रेन बनवली जात आहे,याचा अंदाज लावा?".

modern coaches for kalka Shimla train
modern coaches for kalka Shimla train

नवी दिल्ली - सरकारच्या अनेक मंत्रालयाकडून काही जनहितार्थ माहिती सांगण्यासाठी ट्विटर या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. सरकार आपल्या कामकाजाबाबत जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी किंवा एखाद्या नवीन योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी ट्विटरचा वापर करत असतात.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये सोशल माध्यमावर सर्वात सक्रीय मंत्रायल कोणते असेल तर ते म्हणजे रेल्वे मंत्रालय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसून येते. रेल्वेमंत्री अनेकदा आपल्या ट्विटर हँडलवर अनेक फोटो शेअर करत असतात. यावेळीही त्यांनी रेल्वेच्या एका कोचचा फोटो शेअर करून जनतेला प्रश्न विचारला आहे.

रेल्वे मंत्र्यांनी बुधवारी ट्विटरवर रेल्वेच्या कोचचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, याचा अंदाज लावा?". तसेच, अश्निनी वैष्णव यांनी पुढे लिहिले, "हिंट: जॅक अँड जिल वेंट अप द हिल."

 

रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक ट्रेनचा कोच दिसत आहे. या कोचचा थाट राजेशाही दिसत आहे. या कोचमध्ये मोठ्या खिडक्या आहेत, तर दोन्ही बाजूला बसण्यासाठी एकच सीट आहे. सीटचा दर्जाही खुपच छान दिसून येत आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला फोटो कालका शिमला मार्गावर धावणाऱ्या ट्रेनच्या कोचचा आहे.अलीकडेच, कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीने कालका-शिमला हेरिटेज ट्रॅकसाठी अॅडव्हान्स विस्टाडोम नॅरोगेज कोच तयार केले आहेत. त्याचाच फोटो रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला आहे.

IPL_Entry_Point